हरिण व गोगल गाईचा ची लहर आल्याने खरीप पिकास धोका.

प्रशांत महासागरात एल निनो या वर्षी सक्रिय झाल्याने २०१६ नंतर एल निनो पुनः सक्रिय झाल्याचे दीसत आहे. या वर्षी हवामान अंदाज विभागाने एल निनोचे सावट असल्याचे सांगण्यात येत होते मान्सून  उशिराने महाराष्ट्रात दाखल होईल असे वारंवार सांगण्यात आले  होते. शेतकऱ्यांमध्ये पेरणी विषयी सर्वत्र चर्चा सुरू होती पण मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेघ गर्जेनेस पाऊस झाल्याने जून जुलै महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यामधील पेरणी संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

पिकास हरिण,रानडूकरचा,गोगलगाय चा त्रास.

पावसाने राज्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार हजेरी लावल्याने सर्व जिल्ह्यात पेरणी ही जुलै महिन्यात संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसत होता पण मारठवड्यातील बीड,लातूर, धाराशिव ,नांदेड या चारही जिल्ह्यात पेरणी नंतर हरिण वन्यपशू चा त्रास मोठ्या प्रमाणात लातूर मधील सर्वच तालुक्यातील हरणा मुळे सोयाबीन पिकास धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मुख्य पीक हे सोयाबीन असल्याने या पिकास हरणां पासून बचाव करणे कठीण जात आहे.संध्याकाळी शेतकरी घरी आला असतां हरणाचे कळपाचे कळप शेतात येऊन सोयाबीनचे रोपटे खाहून जात असल्याने प्रत्येक गावामध्ये चर्चा होण्यास सुरवात झाली आहे.

जंगली डुकरांचा त्रास.

पेरणीला उशीर झाल्याने शेतकरी संतप्त होता आता त्यामध्ये नवीन भर पडली आहे. ती म्हणजे डुकरांचा त्रास मागील काही वर्षात गावो गावी झाडी जंगलांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आसे पण शेतीचे औध्योगिकरन झाल्याने वन्य प्राणी जंगलात वास्तव्यास राहणारे ते गाव भोवतालच्या  पिकामध्ये राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नासधुस करून पिकास हानी पोहचवत  आहेत परिणाम शेत मालकाला भोगावे लागत आहे.

गोगल गाईचा उद्रेक.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असल्याने येथील शेतीला पूरक असे पानी मिळत नसल्याने पिकाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत नाही . मागील वर्षी पावसाने चांगली साथ दिली असता पिक उत्पादनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पण जसा मागील वर्षी गोगलगाईणी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पाने खाऊन पीक उत्पादनाला मोठ्या प्रमाणात हानी झाली होती हेच चित्र या वर्षी पण दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *