पंजाबराव देशमुख अस एक नाव ज्याने स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्य प्राप्ती नंतर अनेक महत्वाचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे तसेच कसणाऱ्या जमिनी सावकार निजामी तावडीतून मुक्त करण्याचा लढा, चळवळ सुरू केली महाराष्ट्राला लाभलेले उत्कृष्ठ शेतकरी पुत्र, अनेक कष्टकऱ्यांचे तारणहार, समाज सेवक, राजकारणी अश्या अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व देशास लाभले.

डॉ भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ साली अमरावती जिल्ह्यातील पातळ या एका छोट्याशा गावामधील शेतकरी कुटुंबात झाला. वडील पूर्ण वेळ शेती काम तर आई गृहिणी मदतनीस म्हणून काम पाहत असे भाऊसाहेब देशमुख यांनी सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पातळ गावीच झाले. पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यास अमरावती मधील हिंद हायस्कूल मद्ये दाखल होउन माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मद्ये प्रवेश मिळविला शिक्षणाची ओढ, शिक्षण हेच सामर्थ्य असल्याने त्यांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळविला त्या वेळी भारतात उच्च शिक्षण घेण्याची सोय नसल्याने बहुदा असंख्य विद्यार्थी लंडन ला शिक्षणास जात आसे. भाऊसाहेबांची घरची परिस्थिती बेताचीच असायची घरामध्ये कायम पैशाची टंचाई पण मना मधील बॅरिस्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लंडनला जाण्याचे ठरविले प्रवासासाठी पुरेल एवढे पैशे जमवून युनायटेड किंगडमला रवाना झाले.

पंजाबराव देशमुख शिक्षण 

भाऊसाहेब देशमुख यांचे शिक्षण इंग्लंड मधील नामांकित एडिनबर्ग, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात पी.च.डी तर १९२० साली बॅरिस्टर आणि संस्कृत मध्ये एम.ए.ऑनर पदवी प्राप्त केली.

ब्रिटिश कालीन कायद्याला विरोध 

 महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे इंग्रज व निजाम हुकूमतीच्या अधीन होते १९३० या वर्षी भाऊसाहेब देशमुख ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली कृषीमंत्री पद मिळाले स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांचा होणारा छळ,शोषण, उत्पादनात ब्रिटिश सरकारचा वाटा, शेतकऱ्यांना निजामाला देण्यात येणारा नजराणा, ज्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन कसनारी जमीन सावकारी विळख्यात सापडली जाऊ लागली म्हणून १९३२ साली पंजाबराव देशमुख अथांग प्रयत्नांनी कर्ज विमोचन हा कायदा पारित करून घेतला ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनावर कसल्याही प्रकारचा टॅक्स लावला जाणार नाही.ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी या कायद्यअंतर्गत सावकारी कचाट्यातून वाचवण्याच काम त्यांनी केलं आहे.

कर्ज लवाद बिल 

 स्वातंत्र्य पूर्व काळात भारतातील अनेक भागामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती याचे सर्वाधिक झळ कृषी क्षेत्राला पोहचली होती. १९२० साली तर कृषी क्षेत्राला सर्वाधिक मंदीचे सावट निर्माण झाले. त्यावेळी शेती मधील सर्वाधिक उत्पन्न देणारे कापूस हे पीक नीचांकी पातळी फोहचले होते. याच संधीचा फायदा घेऊन सावकार त्यावेळी कर्जाच्या बदल्यात अनेक संपतीचे व दाग दागिन्यांचे मूल्यांकन करून घ्यायचे ज्यात घरातील भांडी , गुरे, बैल, गाडी, दागिने घेऊन कर्जाच्या बदल्यात वसूल केले जात राहायचे.

या सर्व बाबींचा विचार विमर्श करून भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी वर्गांधील असह्य, दुबळ्या, अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज लवादा कायद्याचा आधार देऊन न्याय देण्याचे काम केले आहे.

शेतकऱ्यांना या बिलाविषयी अनेक प्रकारचे दुष्परिणाम सांगण्याचा प्रयत्न केला किंवा बिला विषयी संभ्रम निर्माण केले सर्व स्तरावरून बिलास विरोध पासून पंजाबराव देशमुख व्यातिथ हतबल झाले होते असेही सांगण्यात येते.अखेर २५ ऑगस्ट १९३२ ते २६ जानेवारी १९३३ हे बिल मंजूर करण्यात आले.

पंजाबराव देशमुख राजकीय करागिर्द 
  1. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण इंग्लंड मधील ऑक्सफर्ड व एडिंगबर्ग विद्यापीठातून पूर्ण केले. 
  2. १९३० मद्ये प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्यत्व प्राप्त केले. 
  3. ते या दरम्यान शिक्षण मंत्री, कृषी मंत्री,आणि सहकार विभागाचे मंत्री बनले.
  4. भारत स्वातंत्र्य प्राप्ती नंतर राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्य बनविण्यात आले.
  5. १९५२ ते १९६२ या वर्षी खासदार म्हणून निवडून आले.
  6. याच काळात भारताचे कृषी मंत्री म्हणून निवड करण्यात आली.
पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेले महत्व पूर्ण कार्य

शैक्षणिक, कृषी,अस्पृश्य अश्या अनेक प्रकारच्या त्यावेळी समस्यांचे निवारण केले होते.

  • शेतकरी संघाची स्थापना करून अनेक शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यात आले.
  • शेतकरी संघाची स्थापना करून महाराष्ट्र केसरी या वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात आली
  • अमरावती मधील अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी महत्वाची भूमिका बजावली
  • श्री ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • भारत कृषक समाजाची स्थापना करण्याचे श्रेय दिले जाते.
  • राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना करण्यात आली.
  • जागतिक कृषी संमेलन भरवले.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी मंत्री पदी असताना १९५९ ते १९६० या वर्षामध्ये जागतिक पातळीवरचे कृषी प्रदर्शन दिल्ली मद्ये आयोजित करण्यात आले होते.

याच प्रदर्शनामुळे कृषी क्षेत्रात क्रांतीचा मार्ग मोकळा झाला या कृषी प्रदर्शनास जगविख्यात अनेक नेते मंडळी अध्यक्ष आले होते ज्यात प्रमुख पाहुणे म्हणून  अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष आयसेन हॉवर, रशियाचे पंत प्रधान इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ असे अनेक मान्यवर या प्रदर्शनास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *