महाराष्ट्रात या वर्षीचा जांभूळ हंगाम सुरू होऊन ही बऱ्याच जिल्यातील उत्पादकांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. वातावरणातील बदलामुळे जांभूळ उत्पादनामध्ये लक्षणीय घट होऊ लागली आहे. मागील १० ते १५ वर्षाच्या काळामध्ये गावोगावी उन्हाळा आला की सर्वांना जांभूळ खाण्याचा मोह आवरत नसे लहान असो या एखादा बुजुर्ग व्यक्तीस लाभदायक औषधी जांभूळ मिळणे कठीण झाले आहे.
गावोगावी वोढा, नदीच्या काठावर, शिव, पाणंद रस्त्यांच्या बाजूला सहज उपलब्ध असणारे काळे शार गजबजलेले जांभळाचे झाड मानवी अतिरेकामुळे काहीसे नष्ट झाले आहे. मागील काही वर्षापासून राज्यातील जांभळाचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे जांभूळ उत्पादक संकटात सापडला आहे.
जांभूळ मधुमेह रोगाकवर गुणकारी तर आहेच पण याचा रस किंवा बिया पासून बनवण्यात येणारी भुगटी आयुर्वेदात अधिक महत्व सांगण्यात आले आहे.एकीकडे राज्यातील जांभळाचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडे मात्र बाहेरून आयात केलेल्या जांभळाला प्रतिकिलो २५० रुपयांचा दर मिळत आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतांच्या खुशीत असणाऱ्या रायगड, शिंधदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातील काही गाव खेड्यांचे अर्थकारण जांभूळ उत्पादनावर अवलंबून आहे. कोकणातील तर काही ठिकाणचे जांभूळ हे जगप्रसिद्ध मानले जातात ज्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, निरुखे, झाराप या तालुक्यातील अनेक गावातील मुख्य व्यवसाय ही केला जातो.या ठिकाणच्या जांभळंला मुंबई,पुणे, हैद्राबाद, चेन्नई, सोलापूर सह अश्या अनेक शहरात मोठी मागणी असते.
जांभूळ उगमस्थान
जांभळाचे मुळ उमस्थान भारत मानण्यात आले आहे. या झाडाचा प्रसार आशिया खंडातील अनेक देशात झाला आहे. या झाडाचे उत्पादन समुद्र सपाटी पासून ते सहा हजार उंचीच्या पर्वता पर्यंत झाड लावण्यात येते.
जांभूळ उत्पादन करणारे राज्य
देशातील अनेक राज्यात जांभळाचे उत्पादन घेण्यात येते. पण महाराष्ट्रातील जांभूळ उत्पादनाचा वाटा इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.भारतातील संबंधित क्षेत्र हे कोरडवाहू आहे. बहुतांश लोकसंख्येचे, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी उपजीविकेचे मुख्य स्त्रोत हा शेती असून. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरण तंत्र जसे की मृदा संवर्धन, नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन इत्यादींच्या दृष्टीने शाश्वत शेती आवश्यक आहे. भारतीय कृषी क्षेत्र हे सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी हरित क्रांती चे जनक स्वामिनाथन यांना सर्वोपरी श्रेय देण्यात येते. कृषी विभागात संबंधित उत्पादने, यंत्रसामग्री, संशोधन इत्यादींची माहिती सरकार द्वारे वेळोवेळी देण्यात येते.
उत्तम आरोग्यासाठी जांभळ खाण्याचे फायदे
जामूनमध्ये अधिक मात्रेत व्हिटॅमिन C, अंटीऑक्सिडंट्स, आणि फायबर्स आहेत, ज्यामुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
मधुमेह व्यक्तीस लाभदायक
जामूनमध्ये अधिक प्रमाणात फायबर्स असतात, ज्यामुळे रक्तातील शर्करा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.
पचनशक्ती सुधारते
जामूनमध्ये अनेक गुणकारी तत्व आणि फायबर्स आहेत, ज्यामुळे तो पाचनशक्तीला मदत करू शकतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी
जामूनमध्ये अधिक मात्रेत अंटीऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात.
वजन प्रबंधन
जामूनमध्ये कमी कॅलरी आणि उच्च फायबर्स आहेत, ज्यामुळे तो वजन प्रबंधनात मदत करू शकतो.