१)रासायनिक खतांचा कमी वापर केला पाहिजे.

हो देशातील शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खता विषयी  खत वापरासाठी मोठी घोषणा केली आहे. मात्रभूमीचे रक्षण करण्यासाठी रासायनिक खताचा वापर टाळून सेंद्रिय खताचावापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे असे म्हणाले आहे.

हो देशातील शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी मोठे आवाहन दिले आहे जर भारतीय मातेला सतत भुसभुशीत ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांना रासायनिक खताचा त्याग केलाच पाहिजे व संतुलित वापर करून मात्र भूमीचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोदी साहेबांनी आवाहन दिले आहे.

२)खत पिशव्या साठी नवीन डिझाईन.

रासायनीक खताच्या पिशव्या साठी नवीन कव्हर बनवण्यात आले आहे. आज दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करणे तसेच सेंद्रिय खताचा मुबलक प्रमाणात वाढ होऊन शेतकरी रासायनीक खत  शेतात कमी वापर करण्याचे आव्हान ही भाषणात सांगितले.

३)खतांची पोषक मात्रा पिकांना उपलब्ध करणे.

राज्यातील शेतकरी रासायनिकखत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पिकास अवाढव्य प्रमाणत शेतकरी अवलंब करीत आहेत.आधुनिक युगात जमीनीचा कस कमी होऊन जमिनीचे उत्पादन कमी होत चालल्याने याचा परिणाम येणाऱ्या भविष्यात शेती व उत्पादनात घट होऊ शकते.

४)PMBJP खत अनुदान योजना अंतर्गत

ऑगस्ट मध्ये केंद्र सरकार (pmbjp) भारतीय जनूरवारक योजना या खत अनुदान योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खत वापर करण्यासाठी खताचा नवीन ब्रँड आणि लोगो म्हणजे एक राष्ट्र एक लोगो सादर करण्याचा प्रस्ताव लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

५)खत कंपन्यांच्या सीएमडीएस ला लीहले पत्र.

आणि एमडींना लिहिलेल्या पत्रात खत विभागाने म्हटले आहे की, पिशवीच्या रचनेत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन करणारा पंतप्रधानांचा संदेश देखील समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मुळे देशातील शेतकऱ्यांना रासायनिक खता विषयी जागरूकता होऊन जास्तीत जास्त ऑरगॅनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करून शेतीत भर्गोच उत्पादन मिळू शकेल असा सरकारचा विचार आहे.

६) खत विभागाने सर्व उत्पादकांना नवीन डिझाइन सामायिक करण्याचे आदेश दिले.

रसायन आणि खत मंत्र्यांनी या योजनेस अंतिम मंजूरी दिली आहे.येणाऱ्या नवीन डिझाईन मधे मोदींची प्रतिमा व खतांचे आवाहन देणारे मजकूर (मी शेतकऱ्यांना आव्हान करतो) असे टाकण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *