Wheat गहू.
गहू एक रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक व घरगुती गरजा पूर्ण करणारे अन्नधान्य आहे. भारताच्या ऐकून अन्नधान्याच्या उत्पादना पैकी गव्हाचे उत्पादन हे ३.५ टक्के आहे.
मात्र इत्र देशाच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टरी भरपूर कमी आहे.
जमिनीची प्रत
गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळवण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीनीची निवड करणे आवश्यक आहे. जमीनीचा PH मात्रा ही ६ ते ७ असली पाहिजे.
पेरणी
गव्हाचे पेरणी करण्यासाठी योग्य वाणाची निवड करणे व दोन ओळीतील अंतर २० ते २२ ठेवावे ज्यामुळे अंतर मशागत करणे सोईस्कर होईल.
हेक्टरी बियाणे पेरणी
- गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाण्याचा पेरणी करण्यात यावी.
- काळी मातीच्या जिरायत पेरणी साठी प्रति हेक्टरी ७५ ते १०० किलो
- लाल मातीची जमीन असेल तर प्रति हेक्टरी १०० ते १२५ किलो.
बीज प्रक्रिया
१) पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम बुरशी रोधक प्रति बियानास व्यवस्थित चोळून घ्यावे.
२) अँझोटोबेक्टर व स्पुरद प्रति १० किलो बियाण्यास २२५ ग्रॅम मिसळून द्यावे.
खत व्यवस्थापन
जमिन काळी, लाल या मुरमाड, पाणथळ अश्या जमिनी साठी खत व्यवस्थापन.
- शेन खत : प्रति हेक्टरी २० ते ३० गाड्या विखरून टाकावे
- बागायती खत व्यवस्थापन : काळी मातीची जमीन असेल तर ५० किलो नत्र,५० किलो स्पुरद ४० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणी करते वेळी देण्यात यावे.
- जिरायती खत व्यवस्थापन : लाल या पाणथळ अश्या जमिनीमध्ये ३० किलो नत्र ३० किलो स्पुरद व २० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणी करते वेळी करण्यात यावी.
पाणी व्यवस्थापन
भारी ते मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल तर.
- पाने फुटण्यास पहिले पाणी १२ दिवसांनी
- कांडी फुटल्यास दुसरे पाणी २० ते २५ दिवसांनी
- तिसरे पाणी कांड्याची वाढ झाल्यास ४० ते ४५ दिवसांनी
- चौथे पाने ओंब्या पोट्र्यात आल्यावर ६० ते ६५ दिवसांनी
- पाचवे पाणी गहू तयार होण्याच्या अगोदर ७५ ते ८० दिवसांनी द्यावे
अंतर मशागत
मराठवाडा व विदर्भात गावामध्ये अनेक प्रकारचे गवत उगवण्यास सुरुवात झाली आहे.
१) गाजर गवत – २ ते ४ पानावर आल्यास मुळा सकट उपसून टाकावे.
२) हराळ – हे गवत २ त ३ आठवड्यात मोठे होते खुरपणी करून टाकावे.
३) गव्हा मधील रुंद पानाचे गवत ३ ते ४ पानाच्या अवस्थेत असल्यास पूर्णपणे विल्हेवाट लावण्यासाठी ४–डी सोडियम साल्ट हे तणनाशक प्रति हेक्टरी १०० ग्रॅम ५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) मेटसल्फ्युरॉन मिथाईल : हेक्टरी २० ग्रॅम ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोग नियंत्रण व कीड व्यवस्थापन
१) तांबोरा : हवामान बदलामुळे तांबेरा रोगाचे प्रमाण वाढले आहे.हा बुरशी जन्य रोग असल्याने हावेद्वरे या रोगाचा प्रसार होतो.
उपाय – तांबोरा रोगाची लागण होताच डायथेन एम ४५ बुरशीनाशक २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून टाकावी.
२) मावा : वातावरणातील बदला मुळे महाराष्ट्रात गहू पिकाचे मोठे नुकसान या मावा रोगाने झाले आहे.
किडीचा प्रादुर्भाव गहू बनण्यास सुरवात झाली की कोवळे शेंडे कुरतडणे तसेच झुंड च्या झुंड पानावर एकवटलेले दिसतात.
उपाय – ॲसिटामिप्रीड ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने २ वेळा फवारणी करावी.
३) तुडतुडे : तुडतुडे प्रमाण मागील काही वर्षापासून गहू उगवणी नंतर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याचा प्रादुर्भाव पाने कुरतडून रस पिने ज्यामुळे पीक पिवळे पडते व ओंब्यातील गर कमी होने.
उपाय – डायमिथोएट ३० ईसी हे औषध १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गव्हाच्या प्रमुख जाती.
जिरायती व बागायती पेरल्या जाणाऱ्या वाणाची माहिती.
१) तपोवन :
बागायती क्षेत्रातील प्रमुख गव्हाचे वान आहे. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल मिळते.
२ गोदावरी :
या वाणाची बागायती क्षेत्रातील वेळेवर पेरणी केल्यास सरासरी उत्पादन हेक्टरी ४० ते ४२ क्विंटल मिळते.
३) एम एसी एस :
बागायती क्षेत्रातील सर्वाधिक मराठवाडा क्षेत्रातील पेरले जाणारे वान आहे. याचे उत्पादन प्रती हेक्टरी ३८ ते ४२ क्विंटल पर्यंत मिळते.
४) एन आय ए डब्ल्यू १९९४ :
बागायती क्षेत्रातील प्रमुख वान असून वेळेवर पेरणी केल्यास हेक्टरी उत्पादन ४० ते ४५ क्विंटल तर उशिरा पेरणी केल्यास ३८ ते ४० क्विंटल मिळते.
५) पंचवटी (एन आय ए डब्ल्यू १५) :
कोरडवाहू गव्हाचे हे ऐक उत्तम वान असून वेळेवर पेरणी केल्यास हेक्टरी उत्पादन ३४ ते ३७ क्विंटल तर उशिरा पेरणी केल्यास ३२ ते ३५ क्विंटल मिळते.
गहू लागवडी खालील प्रमुख देश.
भारतात गहू लागवड क्षेत्र इतर देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. उत्पादन मात्र निम्म्याहून कमी असल्याने भारताचा क्रमांक ७ व्या क्रमांकावर आहे.
१) भारत
२) चीन
३) रशिया
४) अमेरिका
५) ऑस्ट्रेलिया
गहू उत्पादन करणारे प्रमुख देश.
१) जर्मनी
२) फ्रान्स
३) डेन्मार्क
४) इंग्लंड
५) रशिया
६) ऑस्ट्रेलिया
७) अमेरिका