भारतात गांडूळ खत (Vermicompost) निर्मितीचे धोरण मागील दशकापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.याचे मुख्य कारण कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांने शेतकऱ्यांना दिलेला मोलाचे सल्ला व सरकार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात शेतीचे महत्व त्रंत शुद्ध पद्धतीने अधिक उत्पादन कसे घेता येईल. तसेच रासायनिक खतांमुळे शेती व पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात आणून दिल्याने बऱ्येच शेतकरी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचे ठरविले आहे.

देशातील वाढत्या लोकसंख्येचा भार असाच वाढत राहिला तर याचे गंभीर परिणाम शेती वर दिसून येतील. शेतकरी हा कायमच उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर करत असतो. रासायनिक खताच्या भडिमार पणामुळे जमीन नापीक होऊ शकते.व जमिनीतील पिकास पोषक असणारे सूक्ष्म जीव मरण पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी हा प्रति वर्षी किमान दोन ते तीन पिकाचे उत्पादन घेतल्याने सर्वाधिक रासायनिक खतांचा व विविध पेस्टीसाइडचा अती वापरामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर बुरशी चे प्रमाण वाढले आहे.

जर अश्याच प्रकारे जमीनीची पोत बिघडत चालली तर जमीन पूर्णतः नापीक होऊ शकते. आपण ज्या जमिनीला माता समजतो त्या मातेला स्वच्छ ठीकवून ठेवायचे असेल तर सेंद्रिय पद्धतीने शेती किंवा गांडूळ खतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा लागेल.

गांडूळ खत कशाला म्हणतात

जमिनीच्या आतील बाजूस मुलायम माती मद्ये राहणारा किडा म्हणजेच गांडूळ ज्याला आपण (गेचूआ) असेही म्हणतो. मातीतील सेंद्रिय पदार्थ व माती खातो सेंद्रिय पदार्थ त्याच्या शरीराला आवश्यक असेल तेवढा ठेऊन देतो उरलेला भाग विष्ठा सोडून देतो त्यालाच आपण गांडूळ खत म्हणतो. या संपूर्ण प्रक्रियेला पूर्ण होण्यास १ दिवसाचा कालावधी लागतो.

  1. सेंद्रिय खत कसे बनते

जमिनीवरचा पाला पाचोळा कुजवून गांडूळ खत बनवण्यात येतो याबरोबरच एक किंवा अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ असतात जसे की शेन, मानवी मलमूत्र, भाजीपाला, यापासून बनवलेल्या खातास सेंद्रिय खत ही म्हंटले जाते. ज्यामुळे या खताचा पर्यावरणाला कोणताही धोका नसतो.अश्या  खताचा वापर जमिनीत केला असता जमीनीची पोत सुधारणा होते तसेच मातीचे आयुष दीर्घकाळ टिकून राहते.

      २. रासायनिक खत कसे तयार केले जाते.

रासायनिक खते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम चा वापर करून खत बनवले जाते. केमिकल रसायन पासून निर्मिती केलेल्या खतांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. पर्यावरण, जल याचाही समतोल बिघडत चालला आहे. ज्यावेळी या खताच्या अती वापराने पर्यावरणाचा र्हास होईल त्यावेळेस पर्यावरणाचे महत्त्व कळेल.

Vermicompost गांडूळ खत आणि रासायनिक खत फरक काय.

पर्यावरणास पूरक म्हणून गांडूळ खत ओळखला जातो. या खताच्या निर्मितीसाठी कसल्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नसल्याने जमिनीस पोषक ठरते. गांडूळ खताचा उपयोग धान्य पेरणी वेळेस केला असता जमीनीची पोत सुधारते व जमीन भुसभुशीत ठेवणाऱ्या सूक्ष्म जीवाला धोका नसतो.नैसर्गिक खताची किंमत ८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत असते.

रासायनिक खताचा सारखा उपयोग करत राहिल्याने जमीन नापीक, कस कमी होणे, पर्यावरणास हानिकारक, जमिनितल पोषक तत्वांची कमी होते तसेच खताची किंमत ही प्रत्येक फर्टीलायझर ब्रँड च्या खता नुसार बदलत राहते साधारणतः ९०० ते १६०० पर्यंत वाढत जाते.

सेंद्रिय शेती करणारे प्रमुख देश (Major organic farming countries)

युरोप संघ समूहातील सर्वात जास्त सेंद्रिय शेती करणारे २८ देश असून यातील बहुतांश देश हे १०० टक्के सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतात.याच बरोबर अमेरिका, जपान, चीन, इजराइल, भारत यांचाही समावेश आहे. त्याच बरोबर युरोप मधील काही देश तर इतर देशांना सेंद्रिय शेतीतून उत्पादन केलेला भाजीपाला, फळ, धान्य, हे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाजवी दराने विकत.

भारतातील गांडूळ शेती करणारे प्रमुख राज्य कोणते

सिक्कीम हे गांडूळ खताचा उपयोग करून सेंद्रिय शेती करणारे देशातील एकमेव पहिले राज्य आहे. या इवल्याश्या सिक्कीम ने तंत्र शुद्ध पद्धतीने म्हणजे पर्यावरणातील व्यवस्थेला धक्का न लागू देता व जीवन चक्रास लक्षात घेऊन आणि इतर कोणत्याही रासायनिक तसेच केमिकल पासून बनलेल्या औषधाचा वापर टाळून शेती करणे म्हणजे तंत्र शुद्ध शेती या सेंद्रिय शेती होय.

याच सिक्कीम मधील जनतेने सुसंगत सामाजिक भावनेतून २०१५ साल पर्यंत निर्धार केला की कोणत्याही प्रकारचे केमिकल अथवा पेस्टिसाइड वापर करून शेती उत्पादन घेतले जाणार नाही. याच निर्धाराने हे त्यांनी करून ही दाखवले आणि २०१५ साली भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले प्रमुख राज्य बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *