भारतीय आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून ते आज पर्यंत हळद आहारातील मुख्य वनस्पती आहे. याचा वापर रुचकर, स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी व मानवी शरीरातील अनेक आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी आहारात समाविष्ट केली जाते.

लागवड पूर्व मशागत

या वनस्पतीची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यास सुरुवात होते. शेतकरी उत्पन्न भार्गोच मिळावे या हेतूने लागवड करण्याअगोदर शेतजमीन नांगरून व कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालतो लागवडी अगोदर पूर्व मशागत करणे महत्वाचे ठरते.

  • जमीन भुसभुशीत असली पाहिजे पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी.
  • लागवड करणाऱ्या जमीनीचा सामू ६ ते ७ असायला पाहिजे.
  • लागवड करण्या अगोदर माती परीक्षण करून घ्यावे.
  • लागवड करण्या अगोदर जमिनीत असलेले तन वेचून घ्यावे
  • हारळ, केना, इच्का, शिपरट असू नये.

खत व्यवस्थापन

जमीनीची प्रत पाहून सेंद्रिय खताची मात्रा देण्यात यावी जर मध्यम आकाराची जमीन असेल तर प्रति हेक्टर १० ते १२ टन देणे गरजेचे आहे.

खत दिल्याने हळद पोसण्यास फायदेशीर ठरू शकते ज्यामुळे हळदीचे कोंबे मोठे होतील.

हळद लागवड

लागवड करण्या अगोदर सरी सोडून घ्यावे लागेल सरी चे अंतर साधारणतः दोन फूट ते अडीच फूट असेल पाहिजे ज्यामुळे कोळपणी खुरपणी अंतर मशागत करने सोपे जाते.व पाणी देण्यास कोणतेही अडचण निर्माण होणार नाही.

बेणे निवड

  1. निवड करण्याअगोदर बेणे दोन डोळ्याचे आहे का नाही तपासून घ्यावे.
  2. लागवड करण्या अगोदर बेण्यास कोणतेही कीड व रोगाची आहे का याची पुष्टी करून घ्यावी.
  3. बेणे फक्त एकाच जातीचे असणे आवश्यक आहे.

हेक्टरी उत्पादन

भारतात मुख्यतः हळकुंडे या जातीची हळद मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही हळद कडक व पिवळ्या रंगाची असून या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते २७ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

हळद खाण्याचे फायदे

अनेक शरीरातील आजारावर हळद नैसर्गिक पद्धतीने लाभ मिळू शकतो ज्यामध्ये

  1. अँटी व्हायरल, अँटी ऑक्सीडेंट ,अँटी सेप्टिक.
  2. किडनी रोधक, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  3. संधिवात दूर होते, मानसिक ताण कमी होतो.
  4. पोट आणि पोटावरील चरबी कमी होते.
  5. सर्दी, खोकला, ताप कमी होतो.
  6. हृदय रोग, ठोके, आणि मधुमेह कमी होतो

दूध हळद खाण्याचे फायदे

  • सांधेदुखी त्रास जाणवणार नाही.
  • त्वचा विकार कमी होते.
  • वजन कमी होते.
  • झोपेची समस्या निर्माण होणार नाही.
  • कर्क रोग कमी होतो.

हळदीची भाजी

हिवाळ्यामध्ये थंडीच्या कडाक्यात पश्चिम राजस्थानमधील मरुस्थल ज्याला आपण वाळवंटी प्रदेश असे म्हणतो त्या जिल्ह्यात जोधपूर, बारमेर, जयपूर, बलोत्रा, अजमेर हळदीच्या कोंबा पासून हळद भाजी उत्कृष्ट चवीची बनवली जाते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *