तूर व सोयाबीन विदेशातून आयात होणार.

मागील काही वर्षांपासून राज्यात पावसाचं प्रमाण सरासरी पेक्षा चांगल्या प्रमाणात असल्याने शेतकरी बांधवांना पिकाचे होणारे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मिळतं असल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता पण मागील २ वर्षा पासून शेतकऱ्यांच्या शेत मालास भाव हा कमी लागल्याने शेती नियोजनबध्द होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे.

सोयाबीन आयात मुळे भाव घसरणार

केंद्र सरकारने ब्राझील या देशाकडून मोठ्या प्रमाणात जून महिन्यात सोयाबीन आयात करण्याची घोषणा केल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मधील भाव घरण्यास सुर झाले आहे.

ऑगस्ट महिना होऊन ही सोयाबीन भाव ४८०० ते ५००० चा मध्ये असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाची मातीमोल होऊ लागला आहे. शेतकऱ्यानं कडे सोयाबीन कडधान्य साठवणूक उपलब्ध असून कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती पसरत आहे की जर नवीन सोयाबीन ची अवाक वाढली तर जुन्या सोयाबीन भाव परत खालच्या थराला जाऊ शकते.

आफ्रिकन तुर भारतात येणार. 

आफ्रिकन देशात तूर काढणी सुरू झाली असल्याने  केंद्र सरकार भारतीय लोकसंख्येला तूर दाळ घरोघरी पोहचवणे असेल तर तूर दाळ इतरत्र देशाकडून तुरीची आयात करावे लागणार आहे. आस केंद्र शासनाच्या सल्लागार समितीला वाटते. जर देशात आफ्रिकन तूर डाळ  भारतात मागवली तर देशातील तूर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण जर कृषी बाजार समिती मध्ये तूर ची अवाक प्रमाणापेक्षा वाढल्यास व त्यातच आफ्रिकन तूर बाजारात दाखल झाली तर नक्कीच सोयाबीन सारखी भावात घसरण होऊ शकते.

राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक  नुकसान

केंद्र सरकार १५ लाख टन सोयाबीन आयातीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नसल्याने याचा तोटा राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. राज्यात सोयाबीन व तूर हे दोन शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. जर केंद्र सरकार या दोन पिकाची बाहेरील देशांकडून मोठ्या प्रमाणात साठा मागवत  असेल तर शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव कमी मिळू शकतो. शेतकऱ्यांना कधी नव्हे तो १० हजार दर  भेटला होता याच विश्वासाने शेतकऱ्याने आपल्या पूर्ण शेतात तूर व सोयाबीन चे उत्पादन घेण्यास सुूरवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *