तूर-हरहर
Tur पिकाची लागवड शेतीला चालना देणारी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मोठा लाभ कमवून देणारे कडधान्य वनस्पती आहे. Tur पिकाचे उत्पादन देशातील अनेक राज्यात प्रमुख उत्पादन म्हणून घेतले जाते.जगातील इतर देशाच्या तुलनेत सर्वात जास्त तुरीचे उत्पादन करणारा भारत देश असून जागतिक तुरीच्या उत्पादना पैकी भारताचे दरडोई उत्पन्न ६४% पर्यंत आहे. तर इतर देशाचे तुरीचे उत्पादन ३६% येवढे आहे.
जागतिक पातळीवर Tur पिकाची लागवड कडधान्य पिकामध्ये ६ व्या क्रमांकावर करण्यात येते.तर भारताचा इतर जागतिक देशाच्या तुलनेत तूर लागवडीचा वाटा २०२० ते २०२३ या वर्षात ६५ ते ७० टक्के पर्यंत आहे.
तूर लागवड पद्धत
खरीप हंगामातील तूर हे पीक शेतकऱ्यांचे सर्वाधिक कडधान्य पिकाची लागवड केले जाणारे मुख्य पीक आहे.
१) उन्हाळयात खोल नांगरट करून कुळवाच्या सहाय्याने जमीन सपाट करून घ्यावी.
२) जमिनीत असलेला इतर काडी कचरा व पिकाची खोडे वेचून जमीन स्वच्छ करून ठेवावे.
३) तूर लागवड तीन पद्धतीने केली जाते पहिली पद्धत तिफन पद्धतीने पेरणी – दुसरी पद्धत बोध निर्माण करून लागवड- तिसरी पद्धत मजुराच्या सहायाने विशिष्ट अंतरावर टोबून करणे.
४) मृग नक्षत्राच्या मध्यास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.जमिनीत खोल ओलावा असेल तर लागवड पद्धतीने पेरणी करावी
देशात सर्वाधिक Tur उत्पादन करणारे राज्य.
- तुरीचे सर्वाधिक उत्पादन करणारे प्रथम महाराष्ट्र राज्य आहे.
- द्वितीय मध्य प्रदेश
- तृतीय कर्नाटक
- उत्तर प्रदेश
- तेलंगणा
राज्यात मराठवाडा व विदर्भात तुरीचे उत्पादन मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढ होऊ लागल्याने उत्पादनात अग्रेसर दिसत आहे.
भारताला तूर निर्यात करणारे प्रमुख देश
आफ्रिका खंडातील काही देशात खास करून भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करून तुरीची लागवड केली जात आहे.
1) मोजांम्बिक.
२) केनिया.
३) मलावी.
४) टांझानिया.
५) सुदान
भारत सरकार सातत्याने या देशाकडून तुरीचे आयात करण्याचे धोरण राबवत आहे.याचे परिणाम राज्यातील तूर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर
आर्थिक संकट अजून गडद होऊ लागले आहे.
कोरडवाहू क्षेत्रातील तूर हे पीक मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ऊस
तूर हे पीक मराठवाडा व विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी या पिकास ऊस समजले जाते. कारण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने इतर आर्थिक पिकाची लागवड करणे अशक्य होते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक पसंतीचे खरीप हंगामातील तूर सोयाबीन असल्याने यास शेतकऱ्यांचा ऊस म्हणणे वावगे ठरणार नाही.
तूर डाळ भारतीय मेजवानीचा कणा आहे.
देशातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक पसंतीचे तूर कडधान्य पीक आहे. भारतीय भोजन प्रणाली मध्ये दैनंदिन आहारात दक्षिण भारत (पप्पू- सांबार) या नावाने महाराष्ट्रात (वरण) तर उत्तर भारत तूर डाळीपासून (डाळ फ्राय) या नावाने दैनंदिन आहारात समावेश केला जातो.
आयर्वेदात अनेक नैसर्गिक फायदे असल्याने वाढती मागणी
मानवी आरोग्यासाठी आयुर्वेदात Tur डाळ शिजवून खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे. तूर डाळी पासून शरीरास मिळणारे आवश्यक पोष्टीक घटक जसे की ॲमिनो ऍसिड, लोह, आयोडीन, या सारख्या विविध गुणधर्मामुळे जग प्रसिद्ध आहे.
आयाती मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान.
तुरीचे उत्पादन मागील काही वर्षांपासून सातत्याने अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारच्या तूर आयात निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तुरीचे भाव कमी झाल्याने चिंतेचे आर्थिक ढग अधिक गडद होण्याचे चिन्हं दिसत आहे. अश्या धोरणामुळे तुरीचे दर तर खालीच येतील पण तुरीला लागणारे रासायनिक खत, बी बियाणे व औषध
कधी ब्राझील च सोयाबीन असो की कधी आफ्रिकेची तूर शासन मुख्य पिकाचे आयात धोरण शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरू शकते.