Tractor scheme

भारत कृषी प्रधान देश म्हणून जागतिक पातळीवर मोठे योगदान देऊन नाव कोरीत आहे. आज त्याच देशातील बहुतांश शेतकऱ्यांना एक वेळेस शहरात जाऊन नोकरी केलेली बरे असे वाटत आहे. कारण शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची सध्या घडीला मोठी गरज आहे. इस्राईल सारखा वाळवंट प्रदेशातील देश पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसताना अन्नधान्य उत्पादन करून इतर देशास पुरवठा ही करत आहे. पण भारतासारख्या प्रज्याण्य मान असलेल्या देशात शेती पासून वयक्तिक विकास साधता येत नाही ही येथील समाजामध्ये शंका निर्माण झाली आहे.त्याच सोबत मेहनत, ज्ञान, कौशल्य, पणाला लाऊन केले तर शेती फायद्याची ठरते.

वातावरण बदलामुळे कमी पर्जन्यमान होत राहिले तर सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होईल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. दैनंदिन गरजा भगवण्यासोबत आर्थिक मदत ही शेती मधुन मिळते आहे. म्हणून राज्यातील बहुतांशी लोकसंख्या असलेली कुटुंबे हे आज पण ग्रामीण भागात शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असते.

शेती व्यवसाय हे क्षेत्र अनेक घटकांचा अभ्यास करून केली जाणारी आधुनिक शेती आहे. पण आधुनिकीकरणाच्या नादात व महागाईच्या वाऱ्यात शेती अडकेल काय असेही वाटत आहे. पूर्वी आमच्या लहानपणी बैल जोडीच्या मदतीने शेती केली जात असायची त्याचा खर्च ही हातावर मोजण्या इतका असायचा पण आज आधुनिक यंत्र विकसित झाल्याने बैलाचा ची जागा ट्रॅक्टर ने घेतली आहे. अवजारामुळे शेतीचा विकास झालेला दिसतो आहे. पण उत्पादन मात्र तेवढेच राहिले असून खर्च वाढला आह.

Tractor price ट्रॅक्टर किमतीत वाढ.

देशात आधुनिक यंत्राची वाटचाल काही वर्षापासून प्रगती पथावर झाली आहे. आपण गाव खेड्या मद्ये पहिले आहे प्रत्येक घरामध्ये बैलजोडी गाडी शेती विषयक लागणारे सर्व अवजारे गाओ गावी बनवत जात असायचे.पण ट्रॅक्टर चा शेतीमध्ये होणारा वापर हा कुशल कामगाराचा रोजगार हिरवण्याचा आहे.

  1. प्रति वर्षी शेतीस लागणाऱ्या अवजार किंमत ८ ते १० टक्के वाढ होऊ लागली आहे.
  2. शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणाचा किंमत प्रति वर्षी १० ते १२% वाढ होऊ लागली आहे.
  3. सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टरच्या किमतीत ही प्रति वर्षी १५ ते १७% टक्के वाढ होऊ लागली आहे.
  4. प्रत्ती वर्षा प्रमाणे शेतकऱ्यांच्या भावात मात्र सरकार हस्तक्षेप करून बाजार मूल्य निर्धारण करत आहे.
  5. या सर्वांचा बोज शेती सोसेल का हे ही तितकेच महत्वाचे ठरते.
Tractor scheme ट्रॅक्टर योजना .

सरकार द्वारे शेतकऱ्यांना विवध योजना मार्फत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण या योजनांचा प्रभाव बैल पालन पोषण करणाऱ्या शेतकऱ्यावर दिसून येऊ लागला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती ही कमी खर्चा मद्ये होत राहायची पण शेतीच्या आधुनिकीकरणाच्या हव्यास पोटी आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

  • या योजनांचा फायदा डायरेक्ट ट्रॅक्टर कंपन्याला होत आहे.
  • त्यांचे ट्रॅक्टर विकण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही. याची जाहिरात अनुदान देऊन सरकार तर्फे करण्यात येत आहे.
  • या लुभावण्या योजने मुळे शेतकऱ्यांनी बैल जोडी पालन- पोषण करने बंद केले आहे.
  • आज प्रत्येक गावामध्ये मशागतीच्या कामात येणाऱ्या पशू ची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.
  • आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती करण्यास पारंपरिक शेती पद्धती पेक्षा अधिक खर्च येतो.
  • शेतीस आवश्यक मजूर, खत, यांत्रिकीकरण याचे व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चात शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार नसल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *