BIPORJOY CYCLON- या  चक्रीवादळाचा प्रभाव भारतातील महाराष्ट्र,गुजरात,गोवा केरळ या चार राज्यात दिसून येणार आहे या वादळाचे मुख्य केंद्र हे आरबी समुद्रात आहे  ताशी १०० ते १२० किमी ने पुढे सरकत आहे. बीपोरजोय चा प्रभाव जर असाच राहीला तर या चारही राज्यात मान्सून अगोदर पाऊस येण्याची शक्यता पुणे वेध शाळेन व्यक्त केली आहे.

बीपोरजॉय मुळे मान्सून चा वेग वाडला :शेतकरी बांधवानो  २०२३ या वर्षी एलनिनो चा प्रभाव पूर्ण भारतभर  असताना सध्या बीपोरजोय या वादळा मुळे महाराष्ट्राला तसेच केरळ कर्नाटक गुजरात या राज्याला या वादळामूळे मान्सूनला गती मिळत असल्याचे पुणे वेध शाळेने अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात शेतीच्या कामाला वेग येत असून मान्सूनचा वेग वाढल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

एलनिनो  चा प्रभाव कमी होणार:भारत हा कृषि प्रधान देश आहे या देशातील ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर आपली उपजीविका भागवत आहे  जर भारतात एलनिनो चा प्रभाव दिसत असेल तो प्रभाव येथील कृषि उत्पादनावर थेट दिसून येईल पण सध्याची बीपोरजॉय यावादळाची परिस्थिति बगता अल्लनिनो चा प्रभाव हा कमी दिसून येऊ लागला आहे या बीपोरजॉय वादळमुळे मान्सून चे अंगमन हे येत्या ३६ तासां मध्ये  महाराष्ट्र भर दिसून येत आहे .

देशातील या राज्याला या वादळचा फटका बसणार: बीपोरजॉय या वादळामुळे देशातील या चार राज्यांना याचा फटका जाणवणार दक्षिण अरबी समुद्राच्या जवळ च्या भागात १०० ते १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा गुजरात या चरीही राज्यातील मासेमारी करणाऱ्यांना अरबी समुद्रापासून किनार पट्टीकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे .भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार पुढील ३५ तासात आणखी त्रीव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे .