Swaminathan स्वामिनाथन आयोग

भारत स्वातंत्र्यानंतर १९६० च्या सुरुवातीस पासून ते १९७२ पर्यंत सतत एका पेक्षा एक भयंकर दुष्काळी परिस्थितीला देश सामोर जात होता. देशातील उपासमार मिटवण्यासाठी तसेच शेती आणि शेतकऱ्यांच्या अनेक समस्या व प्रश्नाचे निवारण करणारा व्यक्ती उदयास येतो तो व्यक्ती म्हणजे एम एस स्वामिनाथन त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते. त्यांच्या अथांग प्रयत्नातून देशास अन्न गरजा पूर्ण होऊ शकल्या देशांतर्गत त्यांनी गहू व तांदळाच्या जाती निर्माण केल्या व त्यांच्या मुळे गहू,भाताचे,उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ झाली.याच बरोबर शेतकऱ्यांचे उत्पादन कश्या प्रकारे वाढ करता येईल त्याबरोबरच शेतीतून आर्थिक उन्नती कशी साधता येईल यात ही त्यांचे देशातील शेतकऱ्यांसाठी दिलेले मोठे योगदान महत्वाचे ठरते.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कोणत्या

कृषी सायंटिस्ट स्वामिनाथन यांनी ११ महत्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

१) शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे शासनाला कमी दरात वाटप करावे लागेल.

२) ग्रामीण गावातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर आणण्यासाठी मदत करणे व्हिलेज नॉलेज ची स्थापना करावी.

३) पिकाच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के हमी भाव मिळाला पाहिजे.

४) कोणतेही नैसर्गिक अपदा आल्या नंतर कर्ज वसुली मध्ये सवलत देण्यात यावी.

५) शेती वापरत व जंगल वाली जमिन शेती वाहण्याशियाव इतर कोणत्याही व्यवसायास या कारखानदारी करण्यास देऊ नये.

६) शेतकऱ्यांसाठी कृषी जोखीम फंडाची स्थापना करण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कामी येऊ शकते.

७) अल्प भूधारक शेतकऱ्यांना व महिलांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावे.

८) अतिरिक्त, गायरण, माळरान, शासनाच्या अधीन असलेल्या जमिनी शेतकऱ्यांना वितरण करण्यात यावे.

९) विमा योजना देशातील सर्व राज्यात लागू करावी सर्वच पिकासाठी.

१०) शेती कर्जाची सुविधा अल्प भूधारक गरीब गर्जेवांत शेतकऱ्यांना दिली पाहिजे.

११) शेतकऱ्यांना बँका मार्फत दिले जाणारे कृषी लोण ४ टक्के व्याजदराने देण्यात यावे.

National Commision On Farmers राष्ट्रीय शेतकरी आयोग

देशातील शेती व शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण करण्याच्या हेतूने हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे भारतीय शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोग आयोगाची १८ नोव्हेंबर २००४ रोजी स्थापना करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्देश.

स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शेतकरी आयोग डिसेंबर २००४ ते ऑक्टोंबर २००६ दरम्यान पाच अहवाल सादर करण्यात आले.

अहवालामध्ये शेतकरी संकट कारणे , शेतकरी आत्महत्येत होणारी वाढ हे मुख्य विषय होता.शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व व्यापी राष्ट्रीय धोरण अवलंबून अशा समस्याचे निवारण करणे.

  • अलीकडील पावसाचे कमी प्रज्याण्यामान व शेतीच्या संकटामुळे उदरनिर्वाह भागत नसल्याने अंनदात्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते
  • अपूर्ण भू-सूधरणा करणे मुख्य उद्देश.
  • पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासून घेणे.
  • गुणवत्ता व तंत्रज्ञानातील सुधार करने.
  • संस्थात्मक या बँका मार्फत दिले जाणारी कर्जाची पूर्तता.
कृषी सुधारणा

देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक आणि पशुधन यांच्यासाठी जमीन उपलब्ध होण्याच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासाठी जमीन सुधारणा आवश्यक आहे.जमीनीची मालकी हक्क असमानता देशात दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *