२०२४ सुपर एल निनो
देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण २०२३ हे वर्ष शेतीसाठी सर्वात कठीण जाणार असल्याचं भाकीत अगोदरच करण्यात आले होत आणि ते खर ही ठरल आहे. देशाच्या अनेक राज्यात एल निनो प्रभावामुळे परतीचा पाऊस वेळेवर दाखल झाला नसल्याने खरीप हंगाम सोबत रब्बी हंगामातील मुख्य पिकाची पेरणी झाली नाही.
बऱ्याच ठिकाणी तर अती वृष्टी तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात कमी पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी सैरावैर झाला होता. पेरणी झाली तर मनावे तसे उत्पन्न ही या वर्षात झालेलं नाही. काही पिकाचे उत्पन्न झाले तर त्या पिकला योग्य प्रमाणात भाव मिळाला नाही.
आता अश्यातच नवीन चर्चांना उधाण आले आहे २०२४ शेतीसाठी सुपर एल निनो मुळे आर्थिक नुकसान दायक ठरणारे आहे. याच मुख्य कारण म्हणजे भारतीय शेती मान्सूनच्या पूर्णतः पावसावर अवलंबून आहे.
वातावरणाच्या होणाऱ्या बदला मुळे पावसाचे प्रमाण विस्कळीत झाले तर कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांना याचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
सुपर एल निनो काय आहे.
१) पश्चिम प्रशांत महासागरात उच्च हवेचा दाब निर्माण होतो तर पूर्विकडील प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्याला आपण एल निनो म्हणतो.
२) बदलत्या हवामानामुळे तापमानात वाढ होते.ज्यामुळे महासागराचे पाणी गरम होऊन पाण्याचे रूपांतर बाष्पीभवणात होते.
३) एल निनो २०२४ या वर्षांत ७० ते ७५ टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
४) पेरू या देशात एल निनो चां मोठा फायदा होतो. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पेरू देशात पावसाचे प्रमाण वाढते.
हवामान बदलाचे परिणाम
- तापमानात वाढ झाल्याने राज्यात रब्बी हंगामातील पिकास पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- येणाऱ्या वर्षात पावसाचे कमी पर्जन्यमान होऊ शकते.
- भारत जगात कार्बन उत्सर्जनात ३ नंबरचा देश आहे. ज्यामुळे देशातील पर्यावरण ऐक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
- उत्तरेकडील राज्यात एल निनो सर्वाधिक नुकसान होण्याचे अनुमान सांगण्यात येत आहे.
- २०२४ हे वर्ष एल निनो च्या विळख्यात सापडले तर शेतकऱ्यांना चारा प्रश्न भेडसावत जाईल.
जागतिक पर्यावरण बदलाचे संकेत
युरोप,आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, या सर्वच खंडातील जागतिक पर्यावरण बदलामुळे अनेक देशात पावसाचे कमी पर्जन्यमान झाले आहे.