Super El Nino हा एक हवामान बदलाचा परिणाम आहे.जो की मध्य पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढ झाल्याने एल निनो तयार होण्यास पोषक वातावरण मानले जाते. सुपर एल निनो मुळे हवामानाच्या घटनांत अधिक वेग येऊ शकतो जसे की मराठवाडा सारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या समथल ठिकाणी कोरडे वारे वाहने तर अधिक पावसाच्या ठिकाणी अंदाजापेक्षा मोठ्या प्रमाणांत पाऊस पडणे अशा घटनांची नोंद केली जाते.

हवामानातील बदलामुळे युरोप, आफ्रिका, आशिया खंडात २०२४ हे साल NOAA या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक उष्ण जाणवणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.तर काही देशांत पर्जन्यमान कुमकुवत तर काही देशात दुष्काळ पडू पडणार अस या संस्थेकडून सांगितले जात आहे.

National Oceanic And Atmospheric Admistration (NOAA)

भारतातील हवामान हे तीन ऋतू मध्ये विभागले आहे.त्यात उन्हाळा म्हटल तर देशात गर्मीचा मोसम साधारणतः मार्च महिन्यापासून गरमी सुरुवात होऊ शकतो. नेमका याच कालावधीत एल निनो धोका सर्वात त्रिव मध्ये  असे (NOAA) या संकेत स्थळाकडून सांगण्यात येत आहे.

भारतातील दुष्काळ एल निनो मुळे.

ज्या ज्या वेळी देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश वेळी वातावरणातील एल निनो सक्रिय झाला आहे. भारतात २०२३ हे वर्ष एल निनो च्या संकटातून मुक्त झाले नाही तोवर सुपर एल निनो चे २०२४ पर्यंत सावट असू शकते. या वर्षी सर्वधीक तापमान वाढ होणार असे वारंवार सांगण्यात आले आहे. २०१५ ते २०१६ या वर्षी अशाच प्रकारच्या वातावरणात बदल दिसून आले होते. जागतिक  तापमान वाढ ही मोठ्या प्रमाणात झाल्याने तापमान वाढीचे विपरीत नुकसान बहुतांश देशाला सोसावे लागले होते. भारतासह अनेक देशात पूरस्थिती, दुष्काळ, तर काही देशात तापमान वाढीचा फटका बसला होता.

सुपर अल निनो कशाला म्हणतात.

१) प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरी २४ ते २६ अंश सेल्सिअस पर्यंत राहते.

२) जर त्या पाण्याच्या तापमानात वाढ होऊन ३३ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली असेल तर त्यास अल निनो म्हंटले जाते.

३) वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पाण्याच्या तापमानात होणाऱ्या वाढीमुळे अल निनो तयार होण्यास पोषक समजले जाते.

४) ज्या वेळी अल निनो तयार झाला आहे. त्यावेळी भारतात पर्जन्यमान कमी होऊन दुष्काळ पडला आहे.

भारतात पर्जन्यमान कमी होण्याचे कारणे

सुपर एल निनो चे सावट भारतासारख्या विकसनशील देशात मोठे नुकसान करू शकते. भविष्यात फार मोठा दुष्काळ  पडेल असेही सांगण्यात येत आहे. याचे प्रमुख कारण ओझोनचा थर कमी होणे,तापमानातील होणारी वाढ, हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड चे वाढलेले प्रमाण, जागतिक तापमान वाढ झाली आहे.

तापमान वाढीमुळे व अल निनोच्या होणाऱ्या प्रगतीमुळे महाराष्ट्रात अनेक दुष्काळ पडल्याचे पहावयास मिळते.

  1. पहिला दुष्काळ १९६५ते १९६६ साली पडला होता.
  2. दुसरा सर्वात मोठा १९७२ ते १९७३ साली पडला होता.
  3. तिसरा दुष्काळ १९८३ ते १८४ या साली पडलेला
  4. चौथा दुष्काळ २०१२ ते २०१३ या साली पडला होता. लातूर या नावाने ओळखला जातो.

सूचना :-

वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *