Sugar Cane Product ऊस उत्पादन

देशात ऊस उत्पादन करणारे अनेक राज्य आहेत परंतु महाराष्ट्र असे राज्य आहे. की येथील उसा पासून बनवलेली साखर आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम मानली जाते. राज्यातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी दिवसेन दिवस वाढ होत आहे.

भारताच्या ऐकून लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात २२ टक्के सुमारे १४ लाख हेक्टर उसाचे गाळप करून जगविख्यात देशाला मागे टाकले आहे. चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया

Sugarcane cultivation ऊस लागवड.

मराठवाडा ऊस लागवड क्षेत्रात वाढ होऊन ३ .४० लाख हेक्टर वर पोहचली आहे.

सुधारित जातींची निवड : महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सुधारित वाणाच्या जाती दिल्या आहेत.

(१) ८६०३२ (२) निरा ९४०१२ (३) को एम ०२६५ (४) को ९२००५ (५) को सी ६७१ या सुधारित वाणाची लागवड केल्याने साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 Wand Method ऐक डोळा ऊस लागवड पद्धत.

  1. १) ऐक डोळा पद्धत लागवड करण्यासाठी माध्यम ते लालवट जमिनीसाठी दोनी सऱ्यामधील अंतर हे ८० ते १०० सेमी ठेवावे.
  2. काळ्या भुसबुशित जमिनीसाठी १०० ते १२० सेमी ठेवणे आवश्यक आहे.
  3. ऐक डोळा पद्धतीने लागवड करत असाल तर दोन डोळ्यातील अंतर हे २५ सेमी ठेवावे.
  4. सरी मध्ये पाणी सोडून ओल्या मातीत ३ सेमी आता डोळा सूर्याच्या दिशेने टोबुन द्यावे.
  5. चांगल्या ते मध्यम आकाराच्या जमिनीसाठी ११००० हजार ते १२००० हजार ऊस बेणे व डोळे टोबुन लागवड करावे

distance crops अंतर पिके 

ऊस लागवडी सोबत आधुनिक युगातील शेतकरी अतंर पिके घेऊ लागला आहे.

ऊस लागवड करून झाल्यावर नंतर ३ महिन्याचा ऊस वाढीस कालावधी लागतो याच कालावधी मध्ये अंतर पिकाची पेरणी केली असता पीक उत्पादन वाढत आहे.

१) खरीप हंगाम – सोयाबीन, चवळी, बाजरी,मूग, उडीद, मेथी कोथिंबर , भेंडी

२) रब्बी हंगाम – हरभरा, वटाणा,कांदा,गवार, मिरची, पत्ता गोबी,कोबी, लहसुन,

या पिकांची लागवड करून शेतकरी आर्थिक दृष्ट्या ऊस उत्पादनातून संपंन होत आहे.

Organic fertilizers सेंद्रिय खते वापर.

ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हावे या अनुषंगाने राज्यातील शेतकरी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय खताचा वापर करत आहेत.

  • प्रति एकरी २ टन शेणखताचे प्रमाण हे जमिनीच्या प्रति नुसार देण्यात यावे.
  • शेणखत अथवा पाला पाचोळा कूजवून तयार केलेला खतांची मात्रा मोठ्या प्रमाणावर देण्यात यावी
  •  खत देण्याची मात्रा ऊस लागवडी दहा ते पंधरा दिवसांनी वावरामध्ये जमिनीत मिसळून द्यावी
  • लागवड झाल्यानंतर १५ दिवसांनी द्यावयाची आहे.
  • दुसरी मात्रा ४० दिवसांनी पीक वाढीस द्यावयाची आहे.
  • तिसरी मात्रा १०० दिवसांनी ऊस वाढीस होऊ लागल्या नंतर द्यावयाची आहे.

Rooster organic manure कोंबडा जैविक खत.

शेतकरी ऊस उत्पादन व आर्थिक लाभ वाढवण्यासाठी शेतीत अमुलाग्र बदल करत जात आहे.

उदा: कोंबडा खत व डुक्कर खत उसाच्या शेतीत वापरल्याने पीक उत्पादनात वाढ होऊन जमीनीचा कस ही वाढत आहे.

Drip Irrigation ठिबक सिंचन.

१) वाढत्या हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर ऊस उत्पादनावर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

या अनुषंगाने राज्य शासन ठिबक सिंचन योजना वर अवलंब करत आहे.

२) पाणी कमकरते मुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन द्वारे पाण्याची मोठी बचत होत आहे.

३) मराठवाड्यात ऊस उत्पादनातून अनेक शेतकरी सुजलाम सुफलाम झाले शेतकरी खरीपातील मूग,व तूर, तसेच रब्बी हंगामातील करडई हरभरा या पिकाची लागवड कमी करून ऊस उत्पादनावर भर देत आहेत.

मराठवाडा ऊस लागवडीत वाढ.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असूनही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी पाण्याच्या जोरावर ऊस उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे.

८ जिल्यातील मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक ३.८ लाख हेक्टर ऊस लागवड करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात वाढ

ऊस उत्पादनात पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की पहिलं नाव कोल्हापुर, अ. नगर असा शब्द निघताच समोर येतो उसाचा लागवडीचा व तालमीचा फड, (World class sugar)जागतिक अव्वल दर्जाची साखर तयार करणारा जिल्हा म्हणून नावा रुपास आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *