Soybean Farm सोयाबीन शेती.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसे देणारे पिक हे सोयाबीन ठरत आहे.म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त(cash crop) नगदी पिकांच्या यादीत सोयाबीन पिकाला अग्रगण्य स्थान प्राप्त झाले आहे.भारतात मागील काही वर्षा पासून सोयाबीन पिकाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देशात महाराष्ट्राचा सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर नंबर झेपावत आहे तसेच या पिकाने ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
Soybean oil सोयाबीन तेलाची वाढ.
जागतिक पातळीवर खाद्य तेलाच्या किंमतीत रोजचे रोज विक्रमी वाढ होत आहे. म्हणून देशात सोयाबीन लागवडीचा कल निश्चीतच वाढतच जाणार आहे.या पिकास देशातील प्रमुख तेलबिया पीक म्हणून शेतकरी पाहत असतो.
- देशातील खाद्य तेल उत्पादनात वाढ करण्यासाठी सोयाबीनची लागवड करणे आवश्यक आहे.
- देशात वाढती लोकसंख्या लक्षात घेता येणारा काळात खाद्यपदार्थातील घटकांना महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे.
- या वाणाची पेरणी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग सापडला आहे
- कुक्कुटपालन तसेच जनावरांसाठी पेंड खाद्य पदार्थ बनविण्यासाठी पौष्टिक सोयाबीन पेंडीचा वापर केला जातो.
सोयाबीन पासून दुध तसेच सोया पनीर बनवले जाते.
Soyabin Impact सोयाबीन उत्पादन कमी होण्याचे कारणे.
राज्यात सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात असून देखील हेक्टरी उत्पादन कमीच आहे.
१) जमिनीची मशागत वेळोवेळी न करने.
२) आधुनिक तंत्रज्ञानाचा पेरणीसाठी उपयोग न करणे.
३) कृषी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या सुधारित वाणाची लागवड न करणे.
४) पेरणी अगोदर बीज उगविण्याची प्रक्रिया न करणे.
५) वीणा माती प्रशिक्षणा नुसार खतांची मात्रा मुबलक प्रमाणात शेतीस देणे.
६) तन तसेच कीड बुरशी जन्य रोगांवर उपचार वेळेवर न करने
हे सर्व कारणे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान करू शकतात.
सोयाबीन लागवडीसाठी पोषक वातावरण.
राज्यात सोयाबीन लागवडीसाठी पोषक वातावरण लाभले असून ही सोयाबीन उत्पादन सरासरी पेक्षा कमी आहे. होय राज्यात १९ ते ३२ अंश उष्ण व कोरडे हवामान चांगले मानले जाते.
सोयाबीन उगवण क्षमता.
सोयाबीन पेरणी करण्याच्या दृष्टीने घरगुती, पारंपरिक पद्धतीने सोयाबीन हर्वेश्ट करण्याच्या काळजी घेणे.मळणी यंत्राची स्पीड ४०० आरपीएम च्यावर असेल तर बियांच्या अंकुरित डोळ्याला धक्का लागून बियाणे वांज होऊ शकते.कडक उन्हामध्ये बियाणे गरम तापू देऊन एका विशिष्ट भांड्यामध्ये किंवा व त्यामध्ये पॅकिंग करून ठेवावे.
खतांचे हेक्टरी प्रमाण.
खतांचे हेक्टरी प्रमाण हे सोयाबीन पेरणीच्या पेरणीच्या वेळी किंवा जमिनीच्या प्रत नुसार अन्नद्रव्याची कम करता ओळखून ४८ किलो नत्र ,७० किलो स्फुरद व २५ किलो गंधक योग्य प्रमाणात द्यावे.
- खोड माशी.
- पान खाणारी अळी.
- पाने गुंडाळणारी आळी.
रोग नियंत्रण
४. केवढा
५. तांबेरा
६. मूळ कुजव्या
७. देवी
या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी १५ ते २० दिवसाच्या दरम्यान करावी.
२) लागवडीपासून ३० ते ३५ दिवसाच्या नंतर दुसरी फवारणी करावी
३) लागवडीपासून ४० ते ५० दिवसाच्या दरम्यान करावी फवारणी करून घ्यावी.
महाराष्ट्रातील मराठवाडा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे पीक जीव की प्राण बनत चालले आहे.
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे परंतु शेतकऱ्यांसाठी सोयाबीन या पिकाने आर्थिक लाभ मिळवून दिले आहे ते आज तगायत कोणत्याही पीकाने या दुष्काळी परिस्थितीत दिली नाही.