सोयाबीन दूध उत्पादनाचे फायदे . 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सोयाबीन चे उत्पादन मोठ्या प्रमानात घेतले जाते.शेतकरी कुटुंबातील सर्वांनाच सोयाबीन विषयी माहीती असते. देशाला  सोयाबीन उत्पादनाची गरज मोठ्या प्रमानात भासत आहे.जनसंख्या वाढी मुळे दूध उत्पादनात वाढ होत नसल्याने सरकार पुढे दूध पुरवण्यासाठी मोठे आवाहन उभे असल्याने शासन नवनवीन योजना मार्फत शेतकऱ्यांना अनुदान देऊन दूध उत्पादन करण्याचे योजना आखत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात असलेले सोयाबीन पासून दुध बनवता येऊ शकते व तुम्हाला सोया दुधापासून आर्थिक लाभ मिळू शकतो.

सोयाबीन दूध पिण्यास उत्तम आहे. 

नावाप्रमाणेच, सोया दूध म्हणजेच सोयाबीनपासून तयार केलेल दूध मित्रांनो या दुधाची मागणी शहरात खूप मोठ्या प्रमाणात असल्याने या दुधाला दर चांगल्या प्रमाणात मिळत आहे. जीम जाणारे पैलवाणकी करणारे गटामधील लोक मोठ्या प्रमाणात सोयाबीन दुधाचा भरपूर वापर करत आहेत.ज्यांना चांगल्या प्रथिणयुक्त आहाराची गरज असते ते सोयाबीन दुधाचा वापर करत असतात. सोया दुधा मध्ये दिवसेंदिवस मागणीत वाढ होत असल्याने सोया दुधाचा पुरवठा व मागणीतील अंतर वाढतच जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पन्नासोबत दूध बनवण्याची प्रक्रिया सुरू केली तर येणाऱ्या भविष्यात त्यांना चांगले उत्पन्न मिळू शेकते.

सोयाबीन दुधात औषधी गुण शरीरासाठी लाभ दायक. 

आज आपण विविध डेअरी कंपनी दूध विकत घेतो पण ते दूध प्रोसेसिंग करून पॅकेट द्वारे वितरित केले जाते व त्या दुधा मध्ये शरीराला मिळणारे घटक नसल्याने त्याचा शरीराला फायदा होत नाही. भेसळ युक्त दूध दैनंदिन वापरत आल्याने कर्करोगाचा आजार वाढला आहे. पण जर तुम्ही सोयाबीन दुधाचा वापर करत असाल तर कर्करोग आजारापासून मुक्तता मिळू शकते.

१) कर्क रोग तुमच्या शरीरापासून जितका दूर ठेवाल तितकेच तुमचे शरीर निरोगी व मजबूत राहील हे टाळण्यासाठी उत्तम आहार घ्यावा लागेल.

२) नित्य व्यायम केल्यास १ ग्लास सोया दूध पिल्याने हा जीव घेना आजार टाळता येतो.

३)सोयाबीन दुधात सोया प्रथिने आइसोफ्लाव्होनमध्ये हे गुणधर्म व अॅंटी  इस्ट्रोजेणीक गुणधर्म आहेत.

४)कर्करोग हा प्राणघातक आजार असल्याने या रोगाने त्रस्त असलेल्या रूग्णाला डॉक्टरच्या सल्यानुसार सोयाबीन दूध द्यावे.

५)वजन व लठ्ठ पणा कमी करण्यासाठी सोयाबीन दुधाचा वापर केला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *