सोयाबीन बाजारभाव केंव्हा वाढ होईल.

सोयाबीन पीकाची लागवड सर्वच राज्यात केली जात असल्याने सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत चालली आहे.मागच्या दोन वर्षा पासून सोयाबीनच्या बाजार भावातील घसरण ही नीचांकी पातळीवर पोहचली असल्याने बळीराजा चिंतेत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक धोरण मजबूत करणारे पीक असल्याने या पिकास पेरणीस अधिक पसंती दिली जाते. सोयाबीनचे उत्पादन व मिळणारे हमीभाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी इतर पिकास कानाडोळा करत खरीप हंगामातील प्रमुख पिका पैकी असलेली उडीत,मुग पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात कमी केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सोसावा लागत आहे.

मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन व कापूस आसल्याने येथील पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे या मुख्य पिकास योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त व आर्थिक नियोजन कोलमडत जात असल्याने शेतकरी या दबावामुळे विचित्र पाऊल उचलत जात आहे.

सोयाबीन पिकाच्या दरामध्ये मागील ८ महिन्यापासून घसरण 

 राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून पण सोयाबीनच्या दरामध्ये मागील ८ महिन्यापासून सलग खालच्या पातळी वर कोलमडत चालला आहे.

जानेवारी मध्ये सोयाबीन दर हा ५५०० पर्यंत मिळत होता त्याच सोयाबीन चा दर हा ऑगस्ट मद्ये ४८०० पर्यन्त मिळत असल्याने राज्यातील अल्प भूधारक शेतकरी चिंतेत आले आहेत.मागच्या दोन वर्षांपूर्वी या पिकास ११ हजारच्या पुढे हमीभाव मिळाला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सर्व शेती मध्ये सोयाबीन पेरणीस सुरवात केली आहे.

सोयाबीन व्यवस्थापन व खर्च. 

या पिकास खर्च वाढतच चालला असल्याने  बियाणे असो खत हे साल दर सालने वाढतच जात असल्याने तसेच मजुराचा खर्च व वेळेवर करावी लागणाऱ्या कीटक नाशक फवारणीचा खर्च परवडत नसल्याने या पिका संदर्भात शेतकऱ्यांना जोखमीचे पीक वाटत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात या  पिकाची लागवड पेरणी  चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण मागील काही महिन्यापासून सोयाबीन दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. सोयाबीन घरामध्येच साठून ठेवले असल्याने राज्यातील या पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भाव वाढीचा प्रश्न उभा राहीला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *