भारतात ज्वारी हे पीक बहुतांश राज्यात घेतले जाणारे पीक असून ज्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, आंध्र प्रदेश हे ज्वारी पिकवण्यात महत्वपूर्ण मानले जातात असे सांगणे वावगे ठरू शकते पण हीच ज्वारी महाराष्ट्रातील मराठवाड्यात सर्वोत्तम गुणवत्ता असलेली मानली जाते. ज्याला स्थानिक भाषेत (जोंधळा) हे नाव प्राप्त झाले आहे.
ज्वारीचे उगमस्थान आफ्रिका खंडा मद्ये झाला आहे असे सांगण्यात येते. ऐका संशोधनानुसार ज्वारी हे पीक ११ व्यां शतकात आफ्रिकेतून भारतात आले असे ही काही जणांचे मत आहे. पण स्थानिक पातळीवर पुरातत्व विभागाला ज्वारी पीक शोधण्यात यश मिळालं होत त्यात असे निष्पन्न झाले की भारतात पाच हजार वर्षापूर्वीच या पिकाचे उत्पादन घेतले जात असे उत्खननाच्या संशोधनातून सांगण्यात आले होते.
ज्वारी खाण्याचे फायदे.
दैनंदिन आहारामध्ये ज्वारीच्या भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ज्वारी महत्वाची असते.
- ज्वारीच्या भाकरीत तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे पोटाच्या समस्या व गॅस संबंधित कोणतेही आजार होत नाहीत.
- दररोजच्या आहारात ज्वारीची भाकर खात राहिले तर मूळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो.
- ज्वारीच्या भाकरी मद्ये लोह चे प्रमाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने दररोज सेवन करत राहिल्याने ॲनिमिया चा त्रास कमी होऊ शकतो.
- ऍसिडिटी व संबंधित विकार टाळण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले पाहिजे.
ज्वारीच्या भाकरी पासून कोणते खनिज मिळतात.
भारतीय आहार पद्धत पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. ज्यात ताजी भाकर, भात वरण, डाळ, खीर, असे शंभर हून अधिक दररोज ताजे जेवण उपलब्ध असून सुधा आज आपण दैनंदिन आहारामध्ये ज्वारी, बाजरीचे, मक्का पासून बनवलेल्या भाकरी खाणे बंद करत चाललो आहे.जर या अन्नधान्य पासून बनवलेल्या भाकरीचे सेवन करत राहिलो तर मुबलक प्रमाणांत खनिजे शरीरास मिळू शकतात.
- पोटॅशियम
- मॅग्नेशियम
- अमिनो असिड्स
- कार्बोहायड्रेट्स
ज्वारीच्या भाकरी दररोजच्या जेवणात शरीरास गुणकारी पोषक खनिजे मिळून पण भारतीय आहार पद्धतीस पश्चिम आहाराचे वेड लागले आहे. जे बनवण्यापासून ते टेबल वर जाईपर्यंत १५ ते २० दिवसाचा कालावधी लागतो. आज आपण असच अन्न सेवन करत राहिलो तर शरीरातील कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, ऍसिडिटी, यासारखे अनेक विकार होऊ शकतात.
हुरडा ज्वारी.
ज्वारीचे मानवी शरीरासाठी अनेक फायदे तर मिळतच राहतात पण ज्वारी होण्याच्या अगोदर ज्यावेळेस कणसाचे दाणे अगदी कोवळ्या अवस्थेत असताना त्या धान्यापासून बनवण्यात येणाऱ्या कणसाला मराठवाड्यात हुरडा म्हणतात या धान्याला भाकरी सारखेच चवीने खाल्ले जाते. अगदी काही वर्षा पूर्वी याच हूर्ड्या पासून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहेत.
ज्वारीचे पापड (Sorghum Papad)
महाराष्ट्र ज्वारी (जोंधळ्याच्या) पिटा पासून पापड बनवण्यात अग्रेसर आहे.हो मागील काही वर्षा पासून गाओ गावी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिला बचत गटांना शासनातर्फे नवनविन यंत्राच्या साहाय्याने पापड मशीन तसेच तसेच लघु उद्योग चालू करण्यासाठी पापड निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
याच उद्योगातून निर्मित केलेले पापड चवीला खमंग व पांढरे शुभ्र पापड शेतकऱ्यांच्या ज्वारीची चव वाढवत आहेत. जर असेच सुरळीत चालू राहिले तर नक्कीच भारतीय पदार्थाला विदेशातून ही मागणी वाढली आहे.
सूचना :-
वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.