Safflower करडई पीक.

करडई पीक तेल उत्पादनास रब्बी हंगामातील ऐक प्रमुख पिक आहे.जे देशात मोजक्याच राज्यात करडई पिकाची लागवड करण्यात येते. करडई उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यामध्ये या पिकाला रब्बी हंगामाचा बादशा संबोधले जाते.

कमी पाण्याच्या जोरावर पिकाची अत्याधिक उत्पादन क्षमता या पिकाला शेतकऱ्यांच्या प्रत्येक मनांत अधिराज्य गाजवण्यास भाग पाडत आहे.

Safflower land.जमीन 

मध्यम ते हलक्या जमिनीत पेरणी अगोदर मशागत करून पेरणी करण्यात यावी.करडई चे मूळ खोलवर जात असल्याने या पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी व ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी लागेल.

मागील काही दशकापासून पर्यावरणावर झालेल्या दुष्परिणामामुळे याचे पडसाद खरीप व रब्बी हंगामातील तेल गळीत पिकावर दिसून येत आहे.

जल वायू परिवर्तनाचा सर्वात जास्त नुकसान कृषी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर झालेला दुसून येत आहे.

Seed processing improved wan बीज प्रक्रिया सुधारित वान.

रब्बी हंगामात पेरणी करत असताना बियाणे १० ते ११ किलो हेक्टरी बियाणे वापरावे. बियाण्यास अँझोटोबॅक्टर व अँझोस्पिरीलम  या २५ ग्रॅम पावडर १० किलो बियाणात वापर केल्यास उत्पादनात वाढ होते.

      सुधारित वान.            कालावधी             हे उत्पादन 

  • अकोला पिंक.       १२७ ते १३५ दिवस.   १२ ते १४ क्विंटल
  • नारी ५७              १२५ ते १३० दिवस.   १८ ते १९ क्विंटल
  • एस.के.एस २०७.   १२५ ते १३० दिवस    १८ ते १९ क्विंटल
  • पूर्णा ८६              १२० ते १२७ दिवस.   १२ ते १४ क्विंटल
  • पूर्णा १२              १३४ ते १३८ दिवस.    १२ ते १६ क्विंटल
  • भीमा.                 १२७ ते १३२ दिवस     ११ ते १३क्विंटल
  • फुले कुसुमा          १३२ ते १३७ दिवस.    ११ ते १७ क्विंटल

Safflower Cultivation लागवड.

मराठवाड्यातील बीड, सोलापूर, धाराशिव, छ. संभाजी मग, तसेच कर्नाटकातील बिदर,विजापूर, आंध्रातील सिमावृती भागात लागवड केली जाते.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली असता दव पडण्याचे प्रमाण कमी असते पिकावर बुरशी लागणे तसेच मावा पडण्याचे प्रमाण कमी होते.

Production उत्पादन:

करडई सुधारित वाणाची योग्य वापर करून मध्यम ते भारी आकाराच्या जमिनीत पेरणी केली असतां करडई चे उत्पादन हेक्टरी १४ ते १५ क्विंटल मिळत आहे.

Benefits and uses of safflower oil करडई तेलाचे फायदे व गुणधर्म.

या तेलाचा वापर ब्युटी सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्य पदार्थ व दैनंदिन आहारामध्ये केला जातो.

१) मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड : शरीरातील चरबी कमी प्रमाणात वाढ होते दोन्ही चरबी मधील अंतर ठेवते

२) पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड : हा ऐक चरबीचा पदार्थ आहे.व फॅटी एसिड त्याचा दुसरा वर्ग असून ज्या मध्ये दोन किंवा अधिक कार्बन असल्याने याचा फायदा शरीराला मिळतो.

३ करडई पेंड : पशुंसाठी करडई पेंडीचा पोष्टीक आहार म्हणून दिला जातो.

४) करडई भाजी: लहान रोपांची भाजी बनविण्यासाठी वापर केला जातो. करडई पानात अ’जीवनसत्व, कॅल्शियम व लोह मोठ्या प्रमाणावर शरीरासाठी मिळते.

मराठवाडा करडई,सूर्यफूल उत्पादन वाढ.

राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी करडई मराठवाड्यात मात्र वाढ होत आहे. पिकाला रब्बी हंगामात पोषक वातावरण लाभल्या मुळे शेतकऱ्यांना तेल बियांच्या उत्पादना वाढ करणारी ही ऐक महत्वपूर्ण वनस्पती आहे.

बागायती क्षेत्रात करडई लागवड करण्यासाठी तेलबिया मुख्य संशोधनालय हैदराबाद येथून प्रसारित करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *