Roselle Crops अंबाडी पीक
अंबाडी महाराष्ट्रात १९४० ते १९९० दशकातील बहुतांश जिल्ह्यात लागवड केले जाणारे प्रमुख पीक होते. मराठवाडा विभागत शेतकऱ्यांचे सर्वाधिक पसंतीचे पीक असायचे.
पण नंतर शेतकऱ्यांनी आर्थिक गरजे नुसार सर्वाधिक आर्थिक उत्पादन देणाऱ्या पिकास प्राधान्य दिल्याने जसे की उडीद, मूग, तूर, या पिकांचे लागवडी खालील क्षेत्र वाढल्यामुळे अंबाडी पिकाचे क्षेत्र घटले व विकसित वान तयार न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत जात असे.
ज्यामुळे अंबाडी या पिकाला पुर्णतः दुर्लक्षित केल्याने भारतात हे पीक विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. देशातील महाराष्ट्र,प बंगाल, तेलंगणा,आंध्र प्रदेश, बिहार झारखंड, छत्तीसगड अंबाडी लागवडीचे प्रमुख राज्य असायचे.
जमिन
पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते हलक्या जमिनीत पेरणी केली जाते.
अंबाडी हे उष्ण कटिबंधातील पीक असल्याने कमी पावसाच्या जोरावर वाढणारे पीक आहे.
पेरणी
जून जलैमध्ये खरीप हंगामात अंबाडी पिकाची लागवड करण्यात येते. या पिकाची पेरणी मराठवाड्यात मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. जसे की तूर आणि अंबाडी, हायब्रीड व अंबाडी
कीड व्यवस्थापन
या पिकास कोणत्याही प्रकारची कीड व बोंड अळी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. म्हणून या पिकास फवारणी करण्याची गरज भासत नाही.
हेक्टरी उत्पादन
- हे पीक परिपक्व येण्यास ५ ते सहा महिन्याचा कालावधी लागतो.
- पिकाचे बोंड पूर्णतः लाल जांभळे पडल्यानंतर कापणी करून घ्यावी.
- कापणी करून झाल्यावर नमसर पीक असेल तर त्याच्या व्यवस्थतरीत्या पेंड्या बांधून घेतले पाहिजे.
- पेंड्या बांधून झाल्यावर या पिकास पूर्णतः १० ते १५ दिवस सुखु द्यावे ज्यामुळे काढणी करण्यास अडचण येणार नाही.
- या पेंड्या व्यवस्थित सुखल्या नसल्या तर बोंडा मधील बीया बाहेर येणारं नाहीत व उत्पादनावर भर पडू शकते.
- व्यवस्थीत खळ करून झाल्यावर बायांची सफाई करून घ्यावी
- अंबाडी मराठवाड्यात प्रति हेक्टरी उत्पादन ८ ते १० क्विंटल पर्यंत मिळते.
अंबाडी झाडाचे व अंबाडी साल चे फायदे.
- अंबाडी झाडाचे अनेक फायदे आहेत
- बांधलेल्या पेंड्या व्यवस्थीत रित्या ३ ते ४ आठवडे सुखवल्या जातात.
- पुढील १ आठवड्यात पाण्यात भिजवत ठेवल्याने अंबाडीची साल जाड होऊन फुगली जाते.
- ज्यामुळे अंबाडी सोळण्यास तयार होते. अंबाडीच्या सालि पासून धागा, सुतळी, सुंब, सोल, दावे, मोठी रासी बनवण्यात येते.
अंबाडी तेलाचे फायदे.
या अंबाडीच्या तेलामध्ये अनेक नैसर्गिक फायदे आहेत ते जाणून घेणार अहोत.
- अंबाडीच्या तेलामध्ये फॅटी एसिड मानवी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. हृदय व रक्त वाहिन्यासाठी रोग विकार आवश्यक आहे.
- अकाली त्वचा वृद्धत्व कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
- Amino असिड – मानवी शरीराच्या सर्व महत्वाच्या कार्यात करण्यासाठी महत्वाचे ठरते.
- या तेलात जीवनसत्व अ ,जीवनसत्व ई ,हे प्रमुख गुणधर्म आढळतात व या तेलाचे नियमित उपयोग केल्याने कर्करोगाचा दिलासा मिळू शकतो.
- अंबाडी तेलामध्ये अनेक नैसर्गिक औषधी गुणधर्म असल्याने तेलाचे महत्व वाढत चालले आहे.
- संधिवात गुडघेदुखी यासाठी अंबाडी तेलाचे मालिश उपायकारक ठरते.
- मूळव्याध सूज कमी होते.
- सर्दी, मूत्राशय, पुत्रपिंड अश्या व्हायरल इन्फेक्शन बळी पडू देत नाही.
अंबाडी भाजी चे फायदे
पाने कोवळ्या अवस्थेत असल्यास झाडाची पाने तोडून स्वच्छ पाण्यात दुहून घ्यावे. अंबाडी पाणाची भाजी चविष्ट तर असतेच पण अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला अनेक पोष्टीक घटक मिळतात.
यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे पदार्थ या पानात आढळतात. तसेच मानवी शरीरासाठी अंबाडीच्या भाजितून व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन बी ६, झिंक, कॅल्शियम, झिंक, आर्यन,अँटीएक्सीडंट या सारखे अनेक पोषक तत्व भाजी मधून मिळतात