Rise Farm भात शेती.

देशातील विविध राज्यात भात शेतीस प्राधान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते. समस्त भारत देशातील सुमारे निम्म्याहून अधिक लोकसंख्या दैनंदिन आहारामध्ये भाताचा समावेश होतो.

मनुष्याच्या शरीरासाठी भात (Rise) पोषक अन्न घटकाचा पुरवठा नियमित भाताचे सेवन केल्याने होतो. भातातून बऱ्याच अन्न घटकाचा तसेच पोषक तत्त्वाचा शरीराला फायदा मिळत असतो.

Indian basmati rise भात उत्पादन.

भात शेती देशात सर्वच राज्यात अल्प तर कोठे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

दक्षिण, मध्य, उत्तर भारतात भात शेती शेतकऱ्यांचा आर्थिक कणा ठरत आहे. देशातील विविध क्षेत्रात हलक्या ,पाणथळ , मुरमाड पाण्याच्या , लालवट अश्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात वाढणारे व माती परीक्षना नुसार त्या वाणाची लागवड करण्यास कृषी अधिकारी योग्य सल्ला देतात.

महाराष्ट्रात विदर्भ, कोकण पश्चिम ,सह्याद्रीच्या खुशीत शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून या पिकाला भात, साळ, धान, या नावाने ओळखले जाते.

देशातील पंजाब,हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बासमती भाताचे उत्पादन मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत.

 rice production problem. धान ,भात उत्पादन समस्या. 

देशातील भात उत्पादन शमते पेक्षा राज्याचे भात उत्पादन फारच कमी प्रमाणात असल्याने येणाऱ्या भविष्यात भात वाणाची गुणवत्ता सुधारून उत्पदांन वाढ होऊ शकते.

  • सुधारित वाणाची कमी लागवड व पारंपरिक बियाणे वापरल्याने उत्पादनात घट होत आहे.
  • जमिनीची क्षार क्षमता तपासून सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर कृषी सहाय्यक यांचा योग्य सल्ला घेऊनच खतांची मात्रा द्यावी.
  • मान्सून स्थिर होऊन पावसाचे प्रमाण वाढले की कमी कालावधी मद्ये रोप लागवड करून घ्यावी
  • तन, कीड, रोग नियंत्रण मिळवण्यासाठी फर्टिलाइज औषधांचा कमी वापर
  • कोणत्याही पिकाला योग्य वेळी दिलेली खतांची मात्रा त्या पिकांच्या उत्पादनात भरगोस वाढ करते.

Improved varieties of paddy, rice धांन, भात सुधारित जाती.

१) पनवेल– वाणाची ऐकून ३ सुधारित प्रजाती कालावधी ४ महिने १० दिवस असून हेक्टरी उत्पादन ३७ ते ३९ क्विंटल आहे.

२) जया  – या वाणाची कालावधी ही ३ महिने १५ दिवस आहे. हेक्टरी उत्पादन हे ३२ ते ३७ क्विंटल आहे.

३) रत्नागिरी – या वाणाच्या ऐकून ५ सुधारित प्रजाती असून कालावधी ही ३ महिने २५ दिवस आहे. हेक्टरी उत्पादन हे ३५ ते ३८ क्विंटल आहे.

४) कर्जत – या वाणाच्या ८ सुधारित प्रजाती पक्वता कालावधी ३ महिने २८ दिवस आहे हेक्टरी उत्पादन ४० क्विंटल आहे.

५) इंद्रायणी- हा वाण सरासरी ४ महिने २० दिवसात परिपक्व होतो व इंद्रायणी भातावर करपा रोग कमी प्रमाणत पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *