महाराष्ट्र शासनकडून शेतीला जोड धंदा करणाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे विदर्भ ,मराठवाडा,तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अल्प भूधारक शेतकऱ्याला रेशीम उद्योगासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे या अनुदानामार्फत शेतकऱ्याला या योजनेचा आर्थिक लाभ घेऊन शेतीला पूरक असा व्यवसाय करता येईल. भारतात महाराष्ट्र हा कापसाचे पीक घेणारे अग्रगण्य राज्य आहे राज्यातील मराठवाडा,विदर्भातील जमीन ही सुपीक दर्जेदार असल्याने या जमिनीमध्ये कापसाच्या जातीचे वान हे गुणवत्ता प्रदान करणारे पीक असल्याचे दिसून येते विदर्भातील यवतमाळ,अमरावती,अकोला,वाशिम, या जिल्ह्यामधील कापसाला (White Dimond) असे संभोदले जाते.
रेशीम शेती अनुदान व योजना
राज्य शासनाकडून सहकार व पनन वस्त्रउद्योग च्या निर्मितीसाठी चालविली जाणारी रेशीम उद्योग योजना या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्याला कृषि उद्योग व रेशीम आधारित वनसंपत्तिवर अल्पभूधारक शेतकऱ्याला ग्रामीण शेतीला पूरक असे रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय राज्य सरकारने आखले आहे. महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाला पोषक वातावरण असल्याने या क्षेत्रात शेतकऱ्याला अधिक संधि उपलब्ध आहेत. परंतु या उद्योगाची पूर्ण माहिती नसल्याने रेशीम उद्योग हा आर्थिक व सांगोपणाच्या हिताचा नसल्याचे शेतकऱ्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो. पण व्यवसाय पूर्णत: वानस्पतीवर चालणारा असल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होणारे नाही नानाजी देशमुख कृषि संजीवन प्रकल्पाअंतर्गत रेशीम उद्योगाला मिळणारे कर्ज हे ३ लाखा पर्यंत अर्थिक सहाय मदत केली जाणार आहे
तुति लागवड व संगोपणास आर्थिक निधी मंजूर
तुति लागवड हे प्रामुख्याने रेशम शेतीला महत्वाचा नियोजन आहे. तुति लागवड करत असताना योग्य पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते कमी प्रमानाची हलकी निचरा होणारी जमीन असावी जेने करून रोपे हे मरण पावणार नाहीत तुति लागवड केल्यानंतर प्लॉट च्या चहू बाजूने रासायनिक फवारणी करू नये जेणे करून तुति मध्ये विश बाधा होनार नाही तुतीस दिला जाणारा निधी तुति रोपे तयार करण्यासाठी प्रती एकर १ लाख ५० हजार रु तुती लागवड सांगोपणस ३८ हजार रु तुति उत्पादनासाठी लागणारे कीटक संगोपणसाठी, साहित्य खरेदीसाठी दिला जाणारा निधी ७५ हजार रु दिले जाणार आहे.या योजणेचा लाभ घेण्यासाठी http://dbt.mahapocra.gov.in वर जाऊन नाव नोंदी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता