Rel lentil मसूर डाळ
आहार पद्धतीमध्ये मसूर डाळ प्रत्येक स्वयंपाक घरातील आरोग्यासाठी लाभदायक स्त्रोत समजला जातो आहे. १०० ग्रॅम मसूर डाळ आरोग्यासाठी सर्वोत्तम सर्वाधिक पोषक मानली जाते व संपूर्ण जेवणाच्या पौष्टिक गर्जा पूर्ण करते.मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या फायद्यासाठी आजकाल अनेक जण दैनंदिन भोजन प्रणाली मध्ये सर्वाधिक वापर कडधान्यांचा डाळी चां उपयोग केला जातो आहे.
धावपळीच्या युगात शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची भरपाई म्हणून सर्वजण मसूर डाळीचा सात्विक आणि सकस आहार म्हणून खाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ज्यामुळे मसूर डाळ आहारातील प्रमाण वाढल्याने डाळीचे उत्पादन कमी व मागणी वाढल्याने निरंतर भाव वाढ होऊ लागले आहे.
मसूर डाळ महाराष्ट्राच्या गावा गावातील रात्रीच्या पार्टीला मसूर वरण प्रथेचा एक अविभाज्य भाग असून आपल्या दैनंदिन आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने प्रथिनांची कमतरता दूर होते. ज्यामुळे भारतीय आहारात जसे की राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात सर्वात जास्त वापरली जाणारी डाळ म्हणून मसूर कडे पाहिले जाते.
मसूर डाळ खाण्याचे फायदे
१) एक कप मसूर डाळीमध्ये दोनशेच्या वर कॅलरीज असतात.
२) १०० ग्रॅम मसूर डाळी मद्ये १७ ग्रॅम आहारातील फायबर आणि १५ ग्रॅम प्रथिने असतात
३) मसूर डाळीच्या सेवनाने भूक वाढ होते.
४) शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी मसूर डाळीचा वापर या उपयोग केला जातो.
५) वजन वाढवण्यासाठी मसूर डाळीचे नियमित सेवन करावे.
६) मसूर डाळीच्या सेवनाने त्वचेच्या आजारापासून मुक्तता मिळण्यास मदत होते.
७) मसूर डाळीमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने पचनक्रियाची गती कमी होते व रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
८) डायबिटीज व इन्सुलिन ज्या व्यक्तीस कमकरता आहे त्या व्यक्तींना डाळीचे प्रमाण सातत्याने दिल्याने आरोग्य व्यवस्थित राहते.
९) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मसूर डाळीचा उपयोग होतो.
१०) हाडे व दंत निरोगी ठेवण्यासाठी मसूर डाळीची वापर केला पाहिजे.
मसूर डाळीपासून मिळणारे जीवनसत्व
- पोटॅशियम
- व्हिटॅमिन सी
- व्हिटॅमिन बी ६
- व्हिटॅमिन बी २
- फॉलिक ऍसिड
- मॅग्नेशियम
- कॅल्शियम
- झिंक
मसूर या डाळीपासून मिळणारे जीवनसत्व.
डाळीपासून आरोग्यासाठी मिळणारे फायदे कोणते
१) रोग प्रतिकार शक्ती वाढते
मसूर डाळ ही एक शरीराला ऊर्जा वान ठेवणारी डाळ आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते शरीरातल्या इतर कोणत्याही संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.
२) कर्क रोगाच्या नियंत्रणासाठी मसूर फायदे
मसूर मद्ये लेक्टिन नावाचे प्रथिने आढळतात ज्यामुळे कर्क रोग विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे कर्क रोगाच्या पेशी वाढण्यास रोखतात
३) दात हडासाठी उपयुक्त
वाढत्या वयात हाडे व दात मजबूत ठेवण्यासाठी अगदी सहज उपलब्ध असणारी मसूर डाळीचे सेवन नियमित करत राहिल्याने दात व हाडांची समस्या कमी होते.