Red chilli लाल मिरची
जगतील सर्वात जास्त अन्न पदार्थामध्ये चविष्ट जेवण बनविण्यासाठी लाल मिरचीचा वापर करण्यात येतो. जिभेची चव वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरते जर जेवणामध्ये मिरची पावडर वापरले नाही तर जेवणं चवीष्ट म्हणता येत नाही. म्हणून भारतीय उपखंडात मिरचीचे आहारामध्ये मद्ये महत्वपूर्ण स्थान आहे. मिरचीचे उगमस्थान दक्षिण अमेरिकेत मानण्यात आले आहे. पण मेक्सिको या देशात प्रथमतः लागवड करण्यात आली ते साल म्हणजे ईसा पूर्व ७००० वर्ष होय.
लाल मिरची उत्पादन करणारा पहिला देश कोणता.
जगतील सर्वात पहिला मिरचीचे उत्पादन करणारा देश हा मेक्सिको म्हणून ओळखला जातो ईसा पूर्व ७५०० वर्षा पूर्वी अमेरिकन देशातील काही ठिकाणी मिरचीचे लागवड करण्यात आले होते असे पुरातत्व संशोधनातून मानण्यात आले आहे.
मिरची लागवड
राज्यात मिरची लागवड करण्याच्या पद्धती भरपूर प्रमाणात आहेत पण बहुतांश ठिकाणी वाफा पद्धत व सरी पद्धत योग्य मानली जाते. ऊस लागवड ज्या पद्धतीने केले जाते त्याच पद्धतीने काही ठिकाणी केली जाते.
- मिरची लागवड करण्या अगोदर जमीन साफ करून शेणखत व कंपोस्ट खत योग्य प्रमाणात देण्यात यावे.
- कोरडवाहू मिरची लागवड ४० बाय ४० सेमी अंतरावर केली जाते.
- याच अंतराने सरीच्या वरील भागावर लागवड करण्यात यावे.
- नवीन बियाणे असेल किंवा उंच व पसरट होणारे बियाणे असेल तर कोरडवाहू बियानापेक्षा दोन झाडातील अंतर ५० ते ६० सेमी ठेवावे लागेल
मिरची काढणी.
बियाणांची लागवड केल्यापासून मिरचीचे उत्पादन घेण्यास दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो. हिरवी मिरची पूर्ण वाढलेली किंवा फुगलेली चमकदार मिरची तोडण्या योग्य समजली जाते.
-
- मिरची लावणी नंतर दोन ते अडीच महिन्यांनी फळ तोडण्यास सुरुवात करावे.
- किमान ९ ते १० दिवसांनी मिरची तोडण्याचे अंत्र ठेवावे.ज्यामुळे लाल पिवळी मिरची पडणार नाहीत.
- हिरव्या मिर्च्या तोडणी झाल्यावर लाल मिरची तोडण्यास सुरुवात करावी.
- मिरची लागण व्यवस्थित रित्या असेल तर हेक्टरी ८० ते ९० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
मिरची वर रोग कोणते पडतात.
मर : या रोगाची लागण जमिनीतील बुरशीच्या अती प्रमाणामुळे झाडास पकडतो. त्यामुळे झाड सुखने व फांदी वाळणे मुख्य लक्षण आहेत.
भुरी रोग : या रोगाची लागण पानाच्या वरील व खालील बाजूस पांढरी व तपकिरी दिसते या रोगाच्या प्रादुर्भावाने पाने गळती व झाड सुखते.
फुलकिडे : या रोगाचा प्रसार हवामान बदलाने होतो. हे किडे अगदी सूक्ष्म जीव असल्यासारखे जाणवते हे कीटक पिवळसर कमी पिवळट पानात असतात ज्यामुळे अशा किटाणू ची ओळख हे करपलेल्या पानातून व कृतुडलेल्या पानाने ओळखले जाते. पाने कुर्तदल्याने खोड वाळू लागते.
मिरची भाव
हिरवी मिरची दैनंदिन आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बारा मही या पिकाचा दर कमी होत नाहीं म्हणून शेतकऱ्यांना हे पीक नुकसान दायक ठरणारे नाही किमान याचा दर ५० रु प्रति किलो तरी मिळतोच.
लाल मिरची भाव
लाल मिरचीचा वापर पूर्ण भारत करत असतो पण उत्पादन मात्र काहीच राज्यात मर्यादित विभागात केले जात असल्याने या फळाचा दर प्रती वर्ष वाढतच जातो आहे.या वर्षी या लाल मिरचीला सर्वधीक भाव सुटला होता १३६०० प्रति क्विंटल.