सुखलेला मराठवाडा
या वर्षी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटात आणून ठेवले आहे. खरीप हंगामात दोन वेळेस पावसाने दिलेली विश्रांतीमुळे सोयाबीन फुलाची गळती, शेंगात सोयाबीन धान्य भरल नसल्याने आकार बारीक झाला. त्यानंतर कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला जात आहे.
सोयाबीन उत्पादन घटले
महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन उत्पादन घटले असून याचा सर्वाधिक नुकसान हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणं दीपावलीच्या सणात आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे.
सोयाबीन उत्पादन व विक्री
- काही जिल्ह्यांत प्रति एकरी ३ क्विंटल पर्यंत उतार मिळत असल्याने शेतकरी या पिकामुळे आर्थिक नुकसानीच्या उंबरवठयावर आहेत.
- सोयाबीन हे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक असल्याने मराठवाड्यात सर्वाधिक या पीकाची पेरणी केली जाते.
- महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रत्येक कड धान्यावर नजर ठेवल्याने सातत्याने भाव नीचांकी पातळीवर जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
- उत्पादनात होणारी घट, औषधाचे भाव वाढ, खतांचे दर वर्षी होणारे बदल
पावसाची झळ रब्बी पिकाला
एल निनो चा प्रभाव रब्बी हंगामातही दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची कमी नोंद झाल्याने सोयाबीन पिक काढणी नंतर जमिनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांसमोर रब्बी पिक उगवेल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
१) बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्वारी हे पीक दुबार पेरणी करावी लागली आहे.
२) ज्वारीचे पीक उगवण क्षमता कमी झाल्याने तक्रारी वाढत चालल्या आहेत.
३) रब्बी हंगामात कडधान्याची पिके पावसाअभावी मरून जाण्याची भीती.
दुष्कळग्रस्तांसाठी निधीची सवलत.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जमीन महसूलात पीक कर्ज पुनर्गठन आणि शेतीच्या निगडित कर्ज वसुलीत सवलत देण्यात येणार आहे.
चारा प्रश्न
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चारा प्रश्न भेडसावत आहे. राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना जनावरांसाठी खाद्य व वैरणीचा तुटवडा होताना दिसतोय. तर काही ठिकाणी जमिनीत ओलावा नसल्याने दुबार पेरणी संकट उभे टाकले आहे.