Potato बटाटा लागवड
बटाटा भारतात सर्वाधिक लागवड केले जाणारे मुख्य पिका पैकी एक पीक आहे. ऊस, गहू, तांदूळ, हरभरा नंतर बटाटा या पिकाची देशात
लागवड केली जाते.उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे जसे की यूपी, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यातील सर्वाधिक उत्पादन केले जाणारे पीक आहे.
९० ते १०० दिवसाच्या कमी कालावधीत बटाटा या पिकाचे उत्पन्न इतर कोणत्याही पिका पेक्षा मोठ्या प्रमाणात मिळते. राज्यात आलू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत जात आहे.यात पुणे, नगर, आणि सातारा येथील शेतकऱ्यांचा आलू पिकवण्याचा वाटा मोठा आहे.
जमीन
Potato लागवड करण्यासाठी मध्यम ते हलक्या प्रतीची निवड करावी जमीन कसदार व योग्य पाण्याचा निचरा होणारी असावी. जमीनीची P H मात्रा ६ ते ७ पर्यंत असणे आवश्यक आहे.
जमीन जर भुसभुशीत असेल तर बटाटा पोसण्यासाठी अधिक मदत मिळते.
बियाणाचे प्रमाण
बटाटा लागवडी साठी अधिक डोळे असणारे बटाटा बेणे निवड करावे व प्रति हेक्टरी १५ ते १७ क्विंटल पर्यंत लागवड करावी.
लागवड नियोजन
बटाटा हे थंड हवामानात येणारे पीक असल्याने राज्यात पिकाची लागवड मुख्यतः रब्बी हंगामात केली जाते. या पिकास १८ ते २० सेल्सिअस तापमान पोषक मानले जाते.रासायनिक खतांचा हेक्टरी वपर ८० ते १०० किलो नत्र, ६० ते ७० किलो स्फुरद व ७० ते ८० किलो पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावे.
पूर्व मशागत
जमीन नांगरट करते वेळी २५ ते ३० सेमी खोल नांगरून घ्यावी ज्यामुळे जमीन भुसभुशीत होईल १५ ते २० दिवस उन्हात तापू द्यावे. ढेकळे व मोठे मातीचे गोळे कुळवाच्या २ ते ३ पाळ्या घालून जमीन सपाट करून घ्यावी.
खत व्यवस्थाप
पूर्व मशागतीच्या नंतर हेक्टरी २२ ते २५ टन शेणखत किंवा चांगले कुजलेला कंपोष्ट खताची मात्रा द्यावी. ज्यामुळे कस वाढ होईल व बटाटा पोसण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी द्यावा लागेल.
रासायनिक खतांचा हेक्टरी वपर ८० ते १०० किलो नत्र, ६० ते ७० किलो स्फुरद व ७० ते ८० किलो पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावे.
लागवड हंगाम
राज्यात बटाटा लागवड खरीप हंगामात जुलै – ऑगस्ट महिन्यामध्ये तर रब्बी हंगामात ऑक्टोंबर – नोव्हेंबर महिन्यात केली जाते
पूर्व मशागतीच्या नंतर हेक्टरी २२ ते २५ टन शेणखत किंवा चांगले कुजलेला कंपोष्ट खताची मात्रा द्यावी. ज्यामुळे कस वाढ होईल व बटाटा पोसण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी द्यावा लागेल.
रासायनिक खताचा वापर
रासायनिक खतांचा हेक्टरी वपर ८० ते १०० किलो नत्र, ६० ते ७० किलो स्फुरद व ७० ते ८० किलो पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावे
वाफा पद्धत
बटाटा लागवड ही वाफा पद्धत तर काही ठिकाणी सरी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो आहे. देशातील वाढती मागणी लक्षात घेता बरेच शेतकरी सरी पद्धतीने लागवड केल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
बटाटा सुधारित जाती कोणत्या आहेत.
1) कुफरी सिंदुरी :- उत्तर भारतात सर्वाधिक लागवड केली जाणारी ही जात आहे. ९० ते १०० दिवसात परिपक्व होते व हेक्टरी उत्पादन २७० ते २८५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
२) कुफरी चंद्रमुखी :- हे वान परिपक्व होण्यास ९० ते १०० दिवसाचा कालावधी लागतो.या वाणाचे बटाटे गोल व लांबट असतात.व हेक्टरी उत्पादन २४० ते २५० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
3) कुफरी अलंकार :- ही बटाट्याची सुधारित वान परिपक्व होण्यास ७५ ते ८० दिवसाचा कालावधी लागतो. प्रति हेक्टरी २४० ते २५० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
४)कुफरी पुखराज :- या जातीची लागवड यू पी मध्ये सर्वाधिक केली जाते हे वान परिपक्व होण्यास ९० ते १०० दिवसाचा कालावधी लागतो.हेक्टरी २६० ते २८० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.