Pomegranate डाळिंब.

नैसर्गिक पद्धतीने पिकलेले अनेक फळ मानवी आरोग्यासाठी महत्वाची ठरतात.त्यातील एक फळ म्हणजे डाळिंब होय या फळाचे नियमित सेवन करत राहिल्याने अनेक आजारापासून दूर ठेवतात. आपण दैनंदिन दिनचर्याची अनियमितता, प्रदूषण, तणाव, यामुळे आरोग्य बिघडले जात आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, उलटी, मळमळ अशा प्रकारचे विकार शरीरातील ऊर्जा कमी करतात किंवा अशक्तपणा निर्माण होते.  डाळिंब फळाचे सेवन करत राहिल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन ऊर्जा वाढण्यास मदत मिळते तर डॉक्टर अशा विविध प्रकारचा विकार होणाऱ्या पेशंटला डाळिंब फळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

लाल डाळिंब भारतातील महत्वपूर्ण फळ असून बहुतांश राज्यात शेतकरी या फळाचे भरपूर प्रमाणात उत्पादन घेऊन आर्थिक मजल गाठली आहे.या फळाचे उत्पत्ती स्थान इराण मद्ये सांगण्यात येते तर  जागतिक पातळीवर फळाची लागवड युरोप व अमेरिका मध्य आशियाई आफ्रिकन सर्वत्र केली जाते. पण भारतात या फळाचे लागवड करण्यात प्रथम क्रमांक लागतो. भारतातील काही प्रमुख राज्यात जसे की महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक हे प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहेत.

डाळिंब फळ खाण्याचे फायदे.
  • डाळिंब चवीला गोड असतात.
  • अशक्तपणा आजार घालवण्यासाठी फळाचे सेवन सातत्याने केले पाहिजे.
  • कॅन्सर पीडित व्यक्तींना डाळिंब फळाचे सेवन केले असता कर्क रोगाचा प्रादुर्भाव कमी होत.
  • डाळिंब मध्ये अँटी ऑक्सिडंट चे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
  • सतत खात राहिल्याने पेशीचे नुकसान होण्यापासून बचाव करतात.
  • स्मरण शक्ती वाढवण्यास उपयोगी ठरते.
  • पाठ दु:खी, सांदे दुःखी व अनेक प्रकारच्या संधी वात समस्या उद्भवत असतात त्यावर उपाय म्हणून डाळिंबाचा रस घेतले जाते.
  • शरीरातील जळ जळ कमी करण्यासाठी या व्यक्तींनी  अँटीऑक्सिडंट व फायबर चे प्रमाण असलेल्या फळाचे सेवन करावे.
डाळिंब रस पिण्याचे फायदे.(Pomegranate Juice Benefites)

लाल डाळिंब चवीला गोड असलेले फळ सर्वांना खाण्यास आवडते. हे फळ आरोग्यासाठी बहुगुणी फायद्याचे असल्याने सर्वांना खाण्याचा बरोबर रस पिण्याचा आनंद राहवत नाही. दररोज डाळिंब खाण्याने शरीरास अनेक फायदे मिळतात ज्यापासून कर्क रोग, हृदयविकाराची समस्या, स्नायूंची जलद वाढ होणे, पाचन क्रिया उत्तम होणे, वजन कमी होऊ शकते.

शरीरात जळ जळ होणे. (Burning in the body)

शरीरामध्ये जळ जळ होणे किंवा अन्न न पचन होणे असे कोणत्याही आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. डाळिंबाच्या लाल गोल रसाळ परिपक्व असलेल्या बिया तीव्र जळ जळीवर काही दिवसातच समस्येचं निदान लावू शकते.

डाळिंब खाण्याने कर्क रोग कमी होऊ शकतो.

दैनंदिन आहारामध्ये डाळिंबाचे सेवन करत राहिल्याने कर्क रोग या अती गंभीर आजार कमी होऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

 

सूचना :-

वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *