नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या लेखात आपण वायक्तिक शेततळे योजने विषयी माहिती पाहणार आहोत. फळ उत्पादन पिकांसाठी शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन निर्माण करणे. मराठवाडा विदर्भतिल दुष्काळी भागांमध्ये फळउत्पादन पिकांच्या उत्पादणात वाढ व क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे हे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प द्वारे योजना आखण्यात येत आहे.
वयक्तिक शेततळे मागेल त्याला योजना .
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने, कोरडवाहू शेती ही पावसावर अवलंबून राहणाऱ्यां शेतकऱ्यावर आर्थिक टंचाई व पीक उत्पादनावर याचा परिणाम दिसून येत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे शेतीस असलेल्या आपुऱ्य सिंचन सुविधा याला उपाय म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना राबवली आहे. या गोष्टीचा विचार करीता दुष्काळवर मात करण्यासाठी आणि शेती उत्पादनामध्ये स्थिरताआणण्यासाठी राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या जलसिंचनाच्या साठयात वाढ करणे तसेच अल्पभूधारक, करडवाहू शेतकऱ्यास त्यांच्या उत्पादणात वाढ करून आर्थिक जीवनमान उंचाउण समृद्ध करणे या योजणेच लक्ष आहे.
राज्य शासनाच निर्णय
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत हा निधी वितरित केला जाणार आहे. राज्यातिल अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के तर इतेर शेतकऱ्यांना हे अनुदान ४५ टक्के एवढे देण्यात येईल. यासाठी ५ हेक्टर क्षेत्राची मर्यादा करण्यात आली आहे.
शेततळे पात्रता व निकष
- प्रकल्प अंतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेली अत्यल्प,अल्प भूधारक शेकऱ्यांना अनुसूचित जाती /जमाती, महिला दिव्यांग व इतर शेतकरी या योजनेसाठी निवड केली आहे.
- लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळ्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर शेत तळ्याची नोंद करणे बंधनकारक आहे
- योजने अंतर्गत शेततळे मंजूर झाले आहे तितक्याच आकाराचे खोदकाम करणे अवश्यक आहे.
- कृषि विभागामार्फत शेततळे तपासणीसाठी आल्यानंतर ज्या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे त्याच ठिकाणी शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
- शेततळे पूर्ण करण्यासाठी अवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील.
- मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेततळ्याचे प्रकार आकारमानानुसार उभरणीचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाइल.
- या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुनः लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे लागेल.
या योजनेस आवश्यक लागणारे कागदपत्र.
१)अर्जदारचा ७/१२ व ८ अ चा उतारा.
२)अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
३)अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा.
अर्ज कोठे करावा.
इछुक शेतकऱ्यांनी https://dbt. mahapocra.go.in या संकेत स्थळावर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे आपलोड करावी.