कुसुम योजने द्वारे सौरऊर्जा पॅनल व मोटर पंप वाटप
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कृषि सोलर योजने विषयी जाणून घेणार आहोत. जगामध्ये सध्या वायु प्रदूषण वाढल्याने याचे गंभीर परिणाम देशातील इतर विविध भागात दिसत आहे. वायु प्रदूषणामुळे जागतिक हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम भारता सारख्या विकसनशील देशावर दिसून येत आहे.या जागतिक पर्यावरण बदल मुळे भारत देशाला शेती समसेचा सामना करावा लागत असल्याने केंद्र सरकारने वायु प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करत आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकार शेतीवर आधारित सोलर पंप व शेतीस पूरक योजना राबवत आहे. म्हणजे वायु प्रदूषणाच्या बाबतीत भारत हा जगात तीन नंबर चा देश बनला आहे.देशातील वायु व ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना मार्फत सोलार स्कीम शेतकऱ्यांस उपलब्ध करून देणे तसेच शेती साठी पूरक व शेतकऱ्यांच्या जमिनीला विजेचा वापर न करता सोलर पंप द्वारे संचनासाठी पानी, लाइट, उपलब्ध करून देणे ऊं योजनेचा उद्धेश आहे.
१)कृषि सोलर योजना
भारतातील शेतकऱ्यांचे लाइट विजेवरला भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कुसुम योजना राबवली असल्याने या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी अधिक पैसे कमवू शकतात व अक्षय योजनेमुळे पर्यावरणात याचा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. व शेतकऱ्यांची विजेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास मदत होईल . देशातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस मदत करण्यासाठी सरकार कृषि सोलर योजना राबवत आहे. ज्या मध्ये सौर पंप आणि सिंचन प्रणाली समाविष्ट आहे या योजने द्वारे शेत मालकांना संपूर्द करून देण्यात येते. सौर ऊर्जा च्या मदतीने शेतकरी विहीरीतील पानी उपसण्यासाठी सौर उर्जेवर चालणारी उपकरणे व पंप चा उपयोग करून पिकास मुबलक प्रमाणात पानी देऊ शकता.
२) सौर उर्जेमुळे तुम्हाला विजेची बचत होणार आहे ज्यामुळे तुमच्या खिशाला झळ फोहचणार नाही व लाइट लोडशेडिंग चा त्रास कमी होणार.
३)सौरउर्जेतुण उत्पन्न झालेली पॉवर तुम्ही राज्य शासनाला विकू शकता.
४)या योजनेचा अवलंब केल्याने तुम्हाला विजेचे धोके व त्रास होणार नाही.
५)सौरऊर्जा पंप बसवण्यासाठी ६० टक्के पर्यन्त अनुदान दिले जाईल.
६)पीएम किसान योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार ३० -३० टक्के सबसिडी देणार.