नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने पीक अंतर मशागत कामात जोर पकडला आहे. रीम झिम पाऊस पडल्याने शेतीतील तन हे पालवी मार्फत सारखे वाढतच चालले
असल्याने शेतकऱ्यांना अधिक मेहनत करावी लागत आहे. पण आधुनिक तंत्रज्ञाच्या युगात शेती मशागत न करता वेगवेळ्या कंपन्यांनी बनवलेल्या तन तननाशक औषधाचा अवलंब करून गवताची
विल्हेवाट लावण्यासाठी शेतकरी शेतात फवारणी करत आहे.
कीटक नाशकांचा अती वापर शेतीचे नुकसान. 
सध्या एकीकडे शेतीत उत्तम वाणाचा अवलंब केल्याने पीक व्यवस्थापनाचा चांगल्या प्रकारे उपयोग केल्याने पीक उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे आपणाला दिसून येत आहे.तसेच कृषी क्षेत्रात विविध
बदल झाल्यामुळे जसे की भौतिक रासायनिक जैविक बदलाने शेती पिकावर विविध पिकावर किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीड व रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी राज्यातील
शेतकऱ्यांनी मुख्य शस्त्र म्हणून रासायनिक औषधे वापरण्यास सुरवात केली आहे. सुरवातीच्या काळात ही कीटकनाशके वरदान ठरली होती पण नंतर या रासायनिक औषधांनी शेतकऱ्यांसमोर अनेक
समस्या निर्माण केल्या आहेत.
कीटक नाशक वापराचे तोटे.

१ ) कीटक नाशकाचा अंदाधुंद वापरामुळे आपले नैसर्गिक वातावरण हे दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होत चालले आहे. त्याचा परिणाम मानव प्रजातिवर दिसून येऊ लागल्याने मानवी शरीरात विविध आजार पसरण्यास सुरवात झाली आहे. तसेच विविध जमिनीस पोशक असणाऱ्या असणाऱ्या जांतुवर होत आहे.

2) तणनाशक व विविध पीक फवारणी मुळे  विविध प्रकारचे रोग मनुष्यामध्ये पसरत असल्याने ज्यांचे ग्रामीण भागात उपचार देखील सहज शक्य नाही.

३) कीटक नशकाच्या वारंवार फवारणीमुळे  किटाणू  आणि रोगाची प्रतिकारक शक्ति वाढते. ज्यामुळे कमी प्रमाणात वापरून कीटक आणि रोग मारत नाहीत,पण काही दिवसांनी त्यांची संख्या आणखीवा ढल्याचे दिसून आले आहे.

४) आधुनिक शेती प्रधान देशात मनुष्य बळाची संख्या ही मुबलक प्रमाणात आहे परंतु ते शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने शेतकरी तन नाशक तसेच विविध फवारण्या करत चालला आहे या फवारणी मुळे शेतीतील जमिनीचा कस कमी होऊन याचे दुष्परिणाम पिकास दिसत आहेत

.५) रसायनाच्या अंधाधुंद वापरामुळे शेतीस अनुकूल कीटक हानिकारक किटकांपेक्षा जलद गतीने मरण पावतात. बहुतेक वेळा पिकाच्या वरच्या भागावर हानिकारक कीटक शोधतात आणि रसायनाच्या थेट संपर्कात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *