Pea crop वटाणा
वटाणा पीक रब्बी हंगामातील मुख्य पिका पैकी एक पीक आहे. देशातील बहुतांश राज्यात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लेह लदाख व अरुणाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे मुख्य पिक असून या राज्यात मोठ्या प्रमाणात व उच्च गुनवत्तेचे पीक घेतले जाते.
महाराष्ट्रातील वाटाणा लागवड जिल्हे
राज्यात वटाणा पिकाची लागवड पुणे, सातारा, सांगली, नाशिक, जळगावज, अकोला , लातूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वटाणा उत्पादन केले जाते.
पूर्व मशागत
वाटाणा पिकाची लागवड करण्या अगोदर जमिनीची मशागत करणे आवश्यक असते. पेरणी अगोदर नांगरणी व दोन कुळवाच्या पाळ्या घालून जमीन स्वच्छ केली पाहिजे. कुजलेला खत व शेणखत प्रति हेक्टरी १० ते १२ टन कंपोस्ट खताचा मात्रा द्यावी
लागवड
वटाणा लागवड करण्यासाठी जमिन मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. जमीनीचा PH रेशो ५ ते ६ पर्यंत असला पाहिजे.
वटाणा उत्पादन शील पीक असल्यामुळे याची लागवड योग्य रब्बी हंगामातील मोसम मध्ये करण्यात आली पाहिजे.जसे की तापमान २० अंश ते २५ अंश असेल.
पेरणीचा हंगाम
राज्यात वटाणा पिकाची लागवड वर्षातून दोन वेळेस केली जाते. पहिली पेरणी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तर दुसरी पेरणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात करण्यात येते.
वाटाणा सुधारित जाती
सुधारित जाती. प.कालावधी चव. हे उत्पादन
१) अरकेल ५५ ते ६० दिवस गोड. १० ते ११ क्विंटल
२) जवाहर ७५ ते ९० दिवस गोड. ११ ते १२ क्विंटल
२) पिजी ३ १२० ते १३५दिवस गोड. १० ते ११ क्विंटल
४) पंजाब ८८ १०५ ते १२०दिवस गोड. १२ ते १४ क्विंटल
५) अजेता ६ ९० ते १०० दिवस गोड. १० ते १३ क्विंटल
६) ऐपि ३. ७० ते ७८ दिवस गोड. १३ ते १४ क्विंटल
लागवड पद्धत
- वाटाणा लागवड साधारणतः यंत्राच्या साहाय्याने पेरणी करणे आवश्यक आहे.
- कारण दोन रोपातील अंतर समान राहील तसेच दोन्ही ओळीतील अंतर हे समान असल्याने रोपांची वाढ होईल.
- दोन रोपांतील अंतर हे ८ ते १० इंच तर दोन ओळीतील अंतर हे ३० ते ४० इंच असले पाहिजे.
बीज प्रक्रिया
सरासरी वाटाणा पेरणी करण्यासाठी हेक्टरी ५० ते ८० किलो बियाणे लागते. या बियाण्यास पेरणी नंतर कीड व बुरशी लागू नये म्हणून प्रति किलो ३ ते ४ ग्रॅम थायरम चोळून पेरणी करावी.
खत व्यवस्थापन.
पेरणी च्या वेळी जमीनीचा कस वाढवण्यासाठी बरेच शेतकरी शेणखत, गांडूळखत, कोंबडा खत, पेरणी सोबत देतात ज्यामुळे नैसर्गिक पीकाची वाढ होते.
अती संवेदनशील पिकास या खतांची मात्रा दिली असता कोणत्याही इतर खतांची आवश्यकता नाही.
कीड व रोग नियोजन
नेहमी वातावरणात होणाऱ्या दुष्परीनामांचे पडसाद रब्बी हंगामाच्या पिकावर अळी, मावा,तुडतुडे,फुलकिडे पडल्याचे दिसून येते.त्यासाठी आवश्यक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते.
१) मावा : मावा किडीचा नियंत्रणासाठी मिथाईल डीमोटोन १० मिली व १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) शेंगा खाणारी अळी (भुरी) ;शेंगा खाणाऱ्या अळीवर वेळेवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते नाही तर या अळीपासून मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी मेल्याथिओन ३५ मिली, डेलटामेश्रिन ५ मिली १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
भारतातील प्रमुख वाटाणा उत्पादक राज्य.
पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, कर्नाटक, आसाम, बिहार, महारष्ट्र,उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यात वाटाणा उत्पादन केले जाते.
वाटाणा खाण्याचे फायदे
१) हिरवा वाटाणा खात राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
२) हिरव्या वाटान्याने हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होते.
३) वाटाणा सेवनाने रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
४) दैनंदिन आहारामध्ये स्वादिष्ट रुचकर जेवण बनविण्यासाठी वाटण्याचा उपयोग केला जातो.
वाटाणा डाळीपासून मिळणारे जीवनसत्व
- फायबर
- पोटॅशियम
- अमिनो आम्ल
- लोह
- व्हिटॅमिन बी
शरीरासाठी पोषक असणारे घटक डाळीत असल्याने वाटाणा डाळीचे नियमित सेवन केले पाहिजे.
वाटाणा डाळ खाण्याचे फायदे
- शरीरासाठी पोषक कॉलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात मिळते
- वजन कमी करण्यास मदत होते.
- त्वचा रोगाचे प्रमाण व कोणतेही त्वचा संबधित विकार दूर होण्यास मदत होते.
- संधी वात आजार कमी होण्यास मदत मिळते
तूर व हरभरा डाळीला पर्याय म्हणजे वाटाणा डाळ स्वादिष्ट रुचकर असल्याने भारतीय खाद्य पदार्थ मद्ये वाटाणा डाळीचे प्रमाण अधिक वाढत आहे.