कुक्कुट पालन योजना(Poultry Farm) NLM माहिती.  

केंद्र शासनाच्या पशू संवर्धन आणि कुक्कुट पालन विभागामार्फत २०१४ -१५ या आर्थिक वर्षा पासून राष्ट्रीय पशुधन अभियान केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन व कुक्कुट पालन योजनेचा उद्धेश रोजगार निर्मिती प्रती पशू उत्पादकता वाढवणे विकास कार्यक्रमाअंतर्गत एकछता खाली बकरी,बोकड,मेंढया, दूध,अंडी याचे उत्पादनात वाढ करणे. राष्ट्रीय पशुधन योजनेची संकल्पना म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये उत्पादन,विक्रीकर आणि त्यांना चांगल्या दर्जाचा कच्चा माल उपलब्ध करून देणे केंद्र शासनाच्या वरील सुधारित मार्गदर्शक सूचना नुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनाने २०२१-२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM-National Livestock Mission) ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शन  नुसार राज्यात चालवली जात आहे.

NLM (Poultry Farm) कुक्कुट पालन योजनेची उदिष्ट .

१) कुक्कुट (Poultry Farm)पालन पक्षी वंश वळीमध्ये सुधारणा करून कोंबडा पक्षीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे.

२) मांस अंडी उत्पादनात वाढ करणे.

३) मागणी व पुरवठ्या मधील अंतर कमी करणे कुक्कुट पालनास प्रोत्साहन करणे.

४)शेतकऱ्यांसाठी पक्षी पालन विम्यासह जोखीम व्यवस्थापन करणे.

५ )कुक्कुट पालन करणाऱ्यांना दर्जेदार व्यवस्था करून देणे.

६)उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पक्षी उत्पादन सुधारण्यासाठी कैशल्या वर आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.

NLM राष्ट्रीय पक्षी अभियान अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता व निकष

  • उद्योजक संस्थानी प्रकल्प संबंधित प्रशिक्षण प्राप्त केलेले असावे किंवा त्याच्याकडे प्रशिक्षनाचे ज्ञान असावे किंवा कुक्कुट पालना विषयी व्यवस्थापनाचे कामकाज केलेला अनुभव असावा
  • उद्योजक संस्थांनी त्यांचे खाते असणाऱ्या बँकेकडून मान्यता प्राप्त प्रकल्पसाठी कर्ज मंजूरी वित्तीय संस्थाची बँक गॅरंटी घेणे आवश्यक आहे
  • कुक्कुट पालन करणाऱ्या संस्थापकाशी A KYC साठी सर्व कागदपत्र असावेत.
  • राष्ट्रीय पक्षी धन अभियाणा अंतर्गत विविध योजनेची अमलबजावणी अधिकारी व संबधित पशू संवर्धन उपयुक्त राहतील.

NLM या योजनेस पात्र अर्जदारस लागणारे कागद पत्र. 

१)सविस्तर प्रकल्प अहवाल खर्च,निधी, उपलद्धतेचे स्त्रोत, खर्चाचा तपशील

२)जमिनीचा कागदपत्र मालकी हक्क पुरावा ७/१२ दाखला, भाडेपट्टि, करार इत्यादि.

३)प्रत्यक्ष जागेचे फोटो.

४)उद्योगामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची यादी

योजना मार्गदर्शक तत्वाच्या अधीन राहून प्रतीक यूनिटसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के भांडवली सबसिडी जास्तीत जास्त ३० लाख पर्यन्त अनुदान प्रदान करण्यात येईल. सबसिडी भांडवल सबसीडी असेल आणि दोन समान हप्त्यामध्ये दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *