Mung cultivation मूग लागवड
शेती व मानवी जीवनात मूग आहार अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. कमी दिवसांत कडधान्याच्या यादीत सर्वात वेगवान उत्पादन व कमी कालावधीत येणारे पीक म्हणून शेतकऱ्याच्या या पिकाला महाराष्ट्रात अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
खरीप हंगामातील तूर सोयाबीन उत्पादनाच्या नंतर मुगाचे उत्पादन सर्वात जास्त महाराष्ट्रात घेतले जाते. मूग व उडिद ७० ते ८० दिवसात परिपक्व होणारे असल्यामुळे कमी पावसाचे जरी प्रमाण असेल तरी हे पीक जोमाने येतात.
Soil fertility जमीनीची सुपीकता.
उडीद आणि मूग पिकाला भारी ते मध्यम आकाराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असली पाहिजे.
ज्यामुळे पाणी थांबू नये व पाण्याची पातळी वाढली तर हे पीक पिवळे पडून मरून जाऊ शकते.
बियाणे व बीजप्रक्रिया
मुगाचे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित प्रजाती
- आर एम जी – ६२
- आर एम जी – २६८
- टी जे एम – ३
- पी एस – १६
- जवाहर मूग – ७२१
- एस एम एल – ६६८
- के – ८५१
वरील वाणाची पेरणी करत असाल तर हेक्टरी १२ ते १४ किलो बियाणे वापरावे.व बियाणाला बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडमा४ ग्रॅम, थायरम २ ग्रॅम व बाविस्टीन १ ग्रॅम प्रति किलो मूग बियाणाला चोळून लागवड करण्यात यावी.
मूग फवारणी
मूग फुलोऱ्यात आले की मावा व पांढरी माशी किड्याचे प्रादुर्भाव वाढताच फिप्रोनील ५ टक्के ,एस सी २० मीली किंवा इमिडाक्लोप्रिड ,१७.७५ टक्के,एस एल २.५ मिली थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ४ ग्राम १० ते १५ लिटर पाण्यात मिसळून किडींचा जास्त प्रादुर्भाव असल्यास दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
प्रति एकर मूग उत्पादन वरील दिलेल्या बियांनाची लागवड केली असता याचे सरासरी उत्पादन हे ५ ते ६ क्विंटल प्रति एकर येवढे मिळते.
Benefits of eating mung beans मोड मूग खाण्याचे फायदे.
भारतीय आयुर्वेदामध्ये दैंदिन जीवनात मूग खाण्याचे प्रमाण सांगण्यात आले आहे.
हृदयरोगाचा धोका व शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित मोड फुटलेले मूग खाल्ले असता शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
व त्याचबरोबर फायबरचे प्रमाण हे शरीरासाठी संतुलित राहून शरीर सुदृढ व निरोगी राहते.
Nutrient-packed mung beans शरीरासाठी पोषक तत्वानी भरलेले हाय कॅलरी मूग मोडाचे फायदे.
- १०० ग्रॅम मुंग मोड मध्ये २४ कॅलरी
- आहारातील फायबर ७.९ मी.ग्रॅ
- कर्बोदके. ३७.७ मी.ग्रॅ
- चरबी ०.३८ मी.ग्रॅ
- व्हिटॅमिन सी ४.७ मी.ग्रॅ
- सोडियम १५ मी.ग्रॅ
- फॉस्फरस ३६० मी.ग्रॅ
- कॅल्शियम १३२ मी.ग्रॅ
- पोटॅशियम. १२१० मी.ग्रॅ
- मॅग्नेशियम २४ मी.ग्रॅ
- ॲल्युमिनियम १६ मी.ग्रॅ
अंकुरित मुगाचे फायदे
दैनिदिन धावपळीच्या जीवनात अंकुरित कडधान्याचे नियमित सेवन केले पाहिजे. मोड आलेल्या मुगाचे फायदे पाहुया.
१) नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
२) आम्लपित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी नियमित अंकुरित मुगाचे सेवन केले पाहिजे.
३) ज्यांचे शरीर वाढत आहे व लठ्ठपणा जाणवत आहे अशा व्यक्तींना अंकुरित मुगाचे सेवन दैनंदिन वापरात व खाण्यात आणले पाहिजे.
४) डोळे,केस गळती व शरीरातील विविध आजारांना दूर ठेवते.
५) तुमच्या शरीराच्या PH पातळी वाढ होते व ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
६) अंकुरित मुगामध्ये कॅन्सर विरोधी गुण असतात ज्यामुळे शरीर समथल राहते.
दैनंदिन आहारामध्ये अंकुरित मुगाचे मानवी शरीराला पौष्टीक फायदे भरपूर प्रमाणात मिळत असल्याने बर्गर, पिझ्झा खाऊन लट्ट पना, शरीरातील चरबी, शारीरिक विकार, तसेच मानसिक ताण हे जंक फूड किंवा फास्ट फूड खाऊन आपण स्वतः आजार ओढून घेत अहोत.