Moong Dal मुंग डाळ 

कडधान्य प्रजाती मद्ये मूग ३ नंबर चे खरीप हंगामातील प्रमुख पिक आहे. मूग डाळी पासून शरीरास अनेक पोषक तत्व मिळतात जसे की फायबर, फिनोलिक असिड, कार्बोहायड्रेट्स यासारखे पोषक घटक असल्याने मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

मुगापासून प्रमुख पदार्थ म्हणजे मुंग डाळ बनवली जाते. डाळी भारतीय आहारात विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपयोगात आणल्या जातात. इडली, मूग वडा, मुगाचे पापड, मोड आलेले मूग , नमकिन मूग डाळ हे पदार्थ बनवण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो.

वजन कमी करण्यासाठी मूग डाळीचा वापर

प्रत्येक व्यक्तीचे वजन व निरोगी शरीर ठेवण्यासाठी आहारात मूग डाळीचा समाविष्ट केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी, हार्मोन्स क्रिया सुधारण्यासाठी मूग डाळीचा उपयोग होतो.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक उपायांचा अवलंब केला जातो आहे. डाळी मद्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचन क्रिया मजबूत राहते वजन कमी होण्यास मदत होते

मूग डाळ खाण्याचे फायदे

डाळीचा सेवनाने आरोग्यासाठी अनेक चमत्कारिक फायदे मिळू शकतात.

१) उच रक्तदाब कमी होण्यास फायदा होतो.

2) वजन कमी होण्यास मदत होते.

३) हार्मोन्स मुळे पचनक्रिया या जठार यामध्ये सुधारणा होते.

४) मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

५) फ्री रॅडिकल पासून वाचवण्यासाठी मदत मिळते.

६) रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना मूग डाळीच्या सेवनाने रक्त दाबाचे प्रमाण संतुलित राहते.

७) मूग डाळ मद्ये अँटी ऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

८) मूग डाळीच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

मुगाच्या डाळी मध्ये कोणते व्हिटॅमिन जीवन सत्व असतात.

बदलते हवामान याचे दुष्परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर दिसून येउ लागले आहेत.म्हनून हे आरोग्य जोपासण्यासाठी कडधान्य पासून तयार करण्यात आलेल्या डाळी चे सेवन केल्याने शरीराला अनेक जीवन सत्व या पोषक तत्व मिळत असतात.

त्यामुळे सर्वजण आदराने रोजच्या दैनंदिन आहारामध्ये डाळीचा समावेश करण्यास सांगितलं जातं.

  • सोडियम
  • व्हिटॅमिन सी
  • फॉस्फरस
  • कॅल्शियम
  • मॅग्नेशियम
  • पोटॅशियम

मूग ऊर्जा वर्धक असल्याने ताप बुद्धकोष्ठतेच्या रुग्णांनी सेवन केल्याने डाळीत ६ प्रकारच्या जीवनावश्यक धातूचा लाभ मिळतो ज्यामुळे डाळीला सर्वाधिक खाण्यास पसंत केले जाते.

मूग डाळीचे गुणधर्म
  1. मुगाच्या डाळी मद्ये अनेक गुणधर्म आढळतात व खाण्यास रुचकर असतात.
  2. डाळी मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने सौंदर्य वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी उपयोगात येते.
  3. मूग डाळीमध्ये खनिजांची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे आहारातील मूग मुख्य स्त्रोत आहे.
  4. मूग डाळीमध्ये कोलेस्ट्रॉलचे  प्रमाण कमी असल्याने हृदयविकाराच्या पेशंटसाठी मुख्य अन्य पदार्थ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *