एल निनोंचा प्रादुर्भाव असूनही या वर्षी देशात मान्सूनने केलेली प्रगती मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक ठरत आहे. केरळात वेळेच्या अगोदर मॉन्सून पोहचल्याने महाराष्ट्रातही जोरदार आंगमन होण्याचे संकेत दिसत आहेत.पण मागील वर्षाप्रमाणे मोचा चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता अगदी त्याच प्रकारे याही वर्षी रेमल वादळं मॉन्सून अगोदर सर्वत्र पसरले आहे. मॉन्सूनचा विलंब झाला तर दुष्काळी परिस्थितीला अगोदरच तोंड देणारा मराठवाडा पुन्हा येकदा दुष्काळी वणव्यात होरपळून जाईल की काय असं वाटतं आहे.
नैऋत्य मान्सून वाऱ्याचा हंगाम हा जून महिन्यात सर्व साधारण आहे असे IMD या संकेत स्थळा कडून सांगण्यात आला आहे .राज्यातील शेती बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पेरणी अगोदर जमीन मशागत करण्याचा कल वाढला आहे. याच बरोबर सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव परिसरातील शेतकऱ्यांना मान्सूनचे वर्तविण्यात कडून सांगण्यात आलेल्या नव्या अंदाज नुसार कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
२०२३ मधील आलेले वादळ
२०२३ हे वर्ष आशिया खंडातील सर्व देशांना नुकसान ठरवणारे होते अनेक वादळे किनारपट्टीला येऊन धडकले आहेत. भरपूर प्रमाणात मोठी हानी पोहचविली आहे. ज्यात शेतीच,
१) मोचा चक्रीवादळ
२) बिपरजॉय चक्रीवादळ
३) मिचॉन्ग चक्रीवादळ
२०२४ मधील आलेले वादळ
या चालू वर्षात रेमल हे एक धोकादायक चक्रीवादळ मानण्यात आले आहे या वादळापासून अनेक राज्यात पीक, घराचे, तसेच पशू पालनाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे मॉन्सूनकडे आतुरतेने लक्ष लागले आहे. पण रेमल या चक्रीवादळाने नैऋत्य मान्सून वाऱ्याचा वेग वाढवला आहे. ज्यामुळे केरळ राज्यात मॉन्सून लवकर दाखल झालेला दिसतो.
मॉन्सून साठी पोषक वातावरण असून ही मागील तीन दिवसापासून केरळ मध्येच मुक्कामी थांबलेला आहे. केरळ राज्यात दाखल झाल्यापासून मॉन्सून महाराष्ट्रात ६ दिवसात दाखल होतो. हवामान खात्याने राज्यात पुढील ३ तिवसात पाऊस पडण्याचे संकेत दिले आहे.
पुढील वाटचालीस मॉन्सून साठी पोषक वातावरण मानले जात असून मॉन्सून वाटचाल कायम राहू शकते असं काह तज्ञांचे मत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये येणाऱ्या पुढील तीन दिवसात मॉन्सून दाखल होऊ शकतो. कर्नाटक,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगढ,पश्चिम बंगाल च्या उपसागरात दाखल होऊ शकतो.
हवामान विभागाने येणाऱ्या पुढील काय दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पावसासह विजेचा अनुमान लावण्यात आला आहे.