Milk Production Impact.

राज्यातील दुधाचे उत्पादन घटणार.होय राज्यातील दुधाचे उत्पादनात घट होणार ऑगस्ट महिना संपत आला आहे. तरी राज्यातील बहतांश जिल्हे हे कोरडेच आहेत जिल्यातील सर्वच नाले,कॅनाल, पाटबंधारे, प्रकल्प अजून मोठ्या प्रमाणात कमीच वाहले असल्याने राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.येणाऱ्या काही दिवसात हे चित्र आणखी गडद होताना दिसणार आहे.

दूध व्यवसायकांना दुहेरी संकट.

दूध उत्पादनात गत वर्षापासून चांगली वाढ झाली असल्याने शेतीस पूरक व्यवसाय व जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांनी या व्यवसायात यशस्वी भरारी घेत मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनास सुरवात केली होती. पण येणारा काळ कोणाला सांगून येत नसल्याचे दिसून येत आहे. दुधाच्या भावात होणारी घसरन ही आज तागायत थांबलेली नसल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची पातळी वाढतच चालली आहे.

जून महिन्यात ज्या प्रकारे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती त्याच पद्धतीचां पाऊस जुलै,ऑगस्ट महिन्यात तोच नखरा दाखवत आहे.

हिरवा चारा महागणार.

काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवली असून याचे परिणाम शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायावर दिसून येऊ लागला आहे. परिणामी दुधाचे भाव नीचांकी पातळी घट झाली असल्याने अशातच १ महिना होऊन ही पावसाने उघड दिल्याने वैरनीचाही शेतकऱ्या समोर मोठा प्रश्न पडलेला आहे.

मराठवाड्यात दूध उत्पादनात लक्षणीय घट होणार.

Global warming चां प्रभाव देशातील विविध्द राज्यात व  मान्सूनवर होताना दिसत आहे. हवामान बदलामुळे ठिकठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी पावसाने अत्यंत कमी प्रमाणात हजेरी लावली असल्याने याचा परिणाम शेतीवर व दुग्ध व्यवसायावर दिसून येऊ लागला आहे.

मराठवाडा हा राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद होणारा विभाग असल्याने येथील दूध व्यवसाय हा पूर्णतः संकटात सापडत चालला आहे. पावसाच्या अनियमितेमुळे महागलेला चारा  आणायचा कोठून हा प्रश्न पडलेला आहे. येथील शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्या समोर कुटुंब व दुग्ध व्यवसायास लागणारा पैसा या मुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन डगमळत चालले आहे.

दुधाचे प्रमाण घटले तर भेसळयुक्त दूध वाढू शकते.

कधी Lampi व्हायरस तर कधी Global Warming च्या होणाऱ्या बदलामुळे देशातील दुध उत्पादनात घट झाल्याने बेसळ युक्त दुधाचे प्रमाण वाढू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *