1.  पशू पालन व्यवसाय काळाची गरज 

व्यवसाय योजना म्हणजे कोणत्याही विशिष्ट व्यवसायासाठी मेहनत करून संपूर्ण ध्येय व्यवसायाकडे लक्ष देऊन विकसित केलेला प्रकल्प म्हणजे व्यवसाय करणे. डेअरी फार्म व्यवसाय योजना हा व्यवसाय अल्प भूधारक तसेच शेतकरी करू शकतात.व्यवस्थापन जलद आणि सुलभ करणे नवीन व्यवसाय करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार कर्ज,अनुदान, सबसिडी आर्थिक मदत करत असते.

 डेअरी दूध व्यवसाय  

दूध डेअरी व्यवसाय हा शेतीस निगडीत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन मुभलक प्रमाणात आहे. त्या शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करण्यास अनुकूल राहील कारण दूध देणाऱ्या पशू ची संख्या जेवढी राहील त्याच प्रमाणात चारा उपलब्ध असणे आवश्यक असला पाहिजे. दूध व्यवसाय प्रामुख्याने परवडणारा व्यवसाय असल्याने राज्यातील नवयुवक या व्यवसाय आकर्षित होत आहेत.

दुष्काळग्रस्त भागात उत्पादनात वाढ 

मागील काही वर्षात राज्यात पावसाचे प्रमाण हे सरासरी पेक्षा जास्त राहिल्याने याचा फायदा अल्प भूधारक, शेतकरी व दूध उत्पादकांना झाला आहे.या सर्व कारणांमुळे डेअरी फार्म व्यवसाय लोकांसाठी कमी गुंतवणुकीचा व सकल फायदा मिळवून देणारा ठरत आहे राज्यातील मराठवाडा हा सतत दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो पण मागील काही वर्षांत दुष्काळावर मात करून येथील तरुण पिढीने दुग्ध व्यवसायात गरुड झेप घेतली आहे. राज्यात दूध उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी पशूंचे शेन विकून कोटीवधी कमवले.

ज्या शेतकऱ्यंकडे काहीच नाही फक्त एक गायी पासून व्यवसाय सुर्वात केली त्याच शेतकऱ्यांनी एक कोटी पेक्षा मोठ्या घराची बांधणी करून राज्यातील कोट्याधीश दुग्ध उद्योजक बनले आहेत अश्या लाभलेल्या शेतकरी वीर पुत्रांना खरच एक सलाम झाला पाहिजे. घरची हलाखीची परिस्थिती अत्यंत गरिबीतून सुरू केलेला  व्यवसाय आज किशोरवयात असणाऱ्या युवकांना त्यांच्या पासून प्रेरणा घेणारा आहे.

मुक्त संचार गोठा पद्धत पशू पालन.

राज्यातील शेतकऱ्यांचा व्यवसायास वाढणार कल लक्षात घेता मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायास वाढणार असल्याचे समजते. कारण राज्य सरकार देशातील दुधाची गरज लक्षात घेता राज्य सरकार पशू पालन व दूध व्यवसायास विविध योजना राबवत आहे ज्या मध्ये सहकारी तत्वांवर चालणाऱ्या कंपण्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध तसेच दुधाचे जनावरे देऊन आर्थिक मदत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *