नाबर्ड डेयरी सबसिडी योजना काय आहे.
वित्त मंत्री निर्मल सीतारमन यांच्या द्वारे लागू करण्यात आलेली योजना आहे.ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे.आणि अल्प भूधारक आहेत त्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत तसेच युवा बेरोजगार शेतीस पूरक स्वताच आत्मनिर्भर व्यवसाय करणाऱ्यासाठी डेयरी अथवा दूध उत्पादन संबंधित व्यवसाय करणाऱ आहेत त्यांना या योजने मार्फत केंद्र सरकार त्या सर्व युवकांना कमी व्याज दराने पशू पालन व्यवसायास योजने द्वारे रक्कम पुरवली जाणार आहे.राज्यातील सर्व पशु विभाग आहेत त्या सर्व पशू पालन विभागांमार्फत नाबार्ड योजने अंतर्गत सुव्यवस्थित पद्धतीने चालवण्यासाठी योग्य माहिती,प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील ४ करोड शेतकरी युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नाबार्ड योजना मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना व बेरोजगार आहेत त्यांना स्वतचा दुग्ध व्यवसाय व डेयरी फार्म सुरू करता येईल. दूध उत्पादन तसेच विविध डेयरी उत्पादन तयार करता येऊ शकतील.
नाबर्ड डेयरी फार्मिंग लोन लाभार्थी पात्रता
१)शेतकरी
२)कंपन्या
३)संघटित क्षेत्र
४)बिगर सरकारी संस्था
५)संघटित गट
नाबर्ड डेयरी फार्मिंग योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका
१)व्यवसायीक बँका
२)सहकारी कृषि व ग्रामीण विकास बँका
३)प्रादेशिक बँका
४)राज्य सहकारी बँका
५)जिल्हा सहकारी बँका
दुग्ध उत्पादन करणाऱ्या दूध डेयरीसाठी आर्थिक निकष
- चांगल्या प्रमाणात दूध देणाऱ्या पशू जातीची किमत ७०,००० रुपये आहे.
- दुधाची किमत प्रती लिटर ३५ रुपये.
- प्रती किलो हिरव्या चाऱ्याची किमत २ रुपये व सुक्या चाऱ्याची किमत ५ रुपये.
- पशू संवर्धन व देखभाल खर्च प्रती पशू महिना २ हजार रुपये.
- या योजनेअंतर्गत एखादी व्यक्ति एकदाच लाभ घेऊ शकते.
- तुम्ही बँक मार्फत या योजनेचा लाभ घेणार असाल तर सबसिडी अर्ज भरावा लागेल.
नाबार्ड डेयरी योजनेचा फंड अडचणी
दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्य आहे. दूध उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर राज्य आहे १९६० च्या दशकात आरे दूध वसाहतीची स्थापना तसेच १९७० च्या दशकात राज्यात सहकार पत संस्थेचा प्रसार झाल्यामुळे राज्यात दूध सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली. २०२३ मध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला कवडीमोल भाव मिळत आहे. १९६० च्या दशकापासून स्वयंपूर्ण असलेली दूध उत्पादन संस्था आत्ता व्यवसायीक रूपांतरित होत आहे. मागील काही दशकापासून गुजरात मधील दूध उत्पादन करणाऱ्या खासगी संस्था भारत भर पाय पसरवत असल्याने राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या आरे सारख्या वासाहतील धोका निर्माण होऊन आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला आहे.
नाबार्ड डेयरी योजने अंतर्गत लोन सबसिडी किती मिळेल.
केंद्र सरकार नाबार्ड ऋण योजने अंतर्गत वेगवेळ्या व्यवसायासाठी सबसिडी देण्यात येते. सामान्य वर्ग गटातील शेतकऱ्यांना या य योजने अंतर्गत लोन मधील २५ टक्के पर्यन्त सबसिडी चा लाभ मिळू शकतो.
अनुसुसचीत जाती व जमाती व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत ३३ टक्के पर्यन्त सबसिडी मिळू शकते.