लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लोन योजना.
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकरी नवीन व्यवसाय शेतीस अनुकूल तसेच आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी व अल्प मुदतीचे गरजांच्या उदेशासाठी कृषि कर्ज घेत असतो पण मराठवाड्यातील काही जिल्हया मधील म्हणजे बीड,जालना, धाराशिव,लातूर येथील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागत असल्याने भारतातील अनेक वित्तीय संस्था आणि बँका आहेत ज्या शेतकऱ्यांना त्याची शेती उत्पादन बघून कार्यक्षम चालवत यावी म्हणून कर्ज उपलब्ध करून देतात.
कृषि कर्जासाठी अर्ज कसा केला पाहिजे.
कृषि कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही कर्ज योजनेचा लेख पुनः तपासून वाचला पाहिजे. तुम्ही ज्या बँकेतून लोन घेणार आहात संबंधित बँकेच्या पॉलिसीच्या सर्व अटी व नियम वाचून खात्री करावी लागेल. त्या बँकेने मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागेल. या कर्ज योजने प्रकरणात तुम्हाला फक्त बँकेच्या संकेत स्थळावर योग्यरीत्या संवाद करणे आवश्यक आहे. संकेत स्थळावर विचारलेले सर्व कागदपत्र जमा करा आणि सर्व कागदपत्र पुनरवलोकण आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बँक तुमचा अर्ज मंजूर करेल.
कृषि कर्जाचे उदिष्ट व फायदे .
- कृषि कर्ज घेऊन शेतीचे साधने आणि शेती विषयक साधने घेऊ शकता.
- जमीन खरेदी करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकता.
- अल्प भूधारक शेतकरी डेअरी युनिट स्थापन करण्यासाठी कर्ज घेउ शकता.
- तुम्ही हे कर्ज खरीप व रब्बी पेरणी साठी हंगामी कर्ज घेऊ शकता.
कृषि कर्जासाठी पात्र शेतकरी.
कृषि कर्जासाठी पात्र शेतकरी
- किमान शेतकऱ्यांच्या नावाने किमान १ हेक्टर लागवडी योग्य जमीन असायला हवी पाहिजे.
- पशुंची संख्या किमान २ (गाय म्हैस) असायला पाहिजे.
- कमाल कर्जाची रक्कम ही २ यूनिट ला १ लाख ४० हजार असणार आहे.
- यात स्वतःचे योगदान हे २० टक्के असले पाहिजे बँक केवळ ८० टक्के कर्ज मंजूर करेल.
विहित अर्जासाठी लागणारे दस्तयेवज.
- ७/१२ स्वतच्या म्हणजे अर्जदाराच्या नावने असला पाहीजे.
- ८ अ चा उतारा आणि मुद्रांक.
- कोणत्याही बँकांचे तुमच्या नावावर शिल्लक लोन नसले पाहिजे
- सोसायटीचा ठराव असला पाहिजे
- शिफारस कोणत्या पशू साठी केली आहे (गाय म्हैस)
- अधिक माहिती साठी ldccbank.com वर जाऊन माहिती घेऊ शकता