महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मॉन्सूनचे जोरदार अंगमन झाले आहे. याची चर्चा बहुदा मराठवाड्या शिवाय इतर कोणत्याही विभागाला करता येणारी नाही. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पावसाने केरळ मद्ये वेळेच्या अगोदर म्हणजे १ जून ला दाखल झाला होता. नंतर पुढील ५ तारखे पर्यंत केरळ राज्यात पूर्ण पणे स्थिरावला असे वेधशाळेे कडून सांगण्यात आले. याच हप्त्यात मॉन्सून पुढे सरकण्यास दिरंगाई होऊ शकते असे IMD कडून सांगितले गेले मॉन्सून प्रगती होण्याच्या काही दिवसा अगोदर रेमल या चक्री वादळाने मॉन्सून चां वेग वाढल्याने मराठवाड्या सह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना मॉन्सून आनंदोत्सव साजरा करण्यास भाग पाडणारा होता.
ज्या प्रकारे मराठवाड्यात पावसाने हाहाकार घातला आहे, त्याच प्रकारे मागील ३ वर्षाचा इतिहास पावसाने मोडून काडला आहे. असा पावसाचा उपद्रव कित्येक वर्षा नंतर पहावयास मिळतो.
कोकण पाऊस
दरवर्षी कोकणातील पावसाचे प्रमाण हे राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत जास्त असते. पण १६ जून होऊन ही पावसाचे ढग काही दाटून आले नसल्याने पुनः२०१६ व २०१७ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अस दिसत आहे.मागील दोन वर्षापासून एल निनोचा प्रादुर्भाव वाढल्याने कोकणासह अनेक राज्यात मॉन्सून अनियमित होउ लागला आहे.
मराठवाडा पाऊस पडण्याचे संकेत
रेमल या चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर, छ संभाजी नगर, नांदेड, या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद सर्वसाधारण पेक्षा जास्त करण्यात आली आहे. नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा मराठवाडा या वर्षी मात्र मॉन्सून मय झाला आहे.
मॉन्सून मराठवाड्या सह पूर्ण राज्य भर व्यापनार आहे ,असा अंदाज मुंबई हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महासागरातील पाण्याच्या तापमानात होणारी कमी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण तापमानात कमी झाली असता ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात ला निना याचा विकास झाला तर देशांतर्गत पावसाचे प्रमाण वाढू शकते असे IMD कडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील ठीक ठिकाणी पावसाची हजेरी सुस्त चालू आहे मात्र पुढील पाच ते सहा दिवस मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.
तुरळक ठिकाणी वीज, वारा होऊ शकतो तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो.