मराठवाडा मुक्ती संग्राम
मराठवाडा नाव म्हटल समोर.. समोर येतो फक्त दुष्काळ याच मराठवाड्यातील जनेतेनी सोसल्या अस्मानी आणि उस्मानी झळा.
या त्रिव झळे तून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ याच दिवशी मराठवाड्यातील तमाम शेतकरी कुटुंबातील नागरिकांनी गुलामीच्या तावडीतून मुक्त होऊन स्वातंत्र्यानंतर आनंदात घेतलेला श्वास म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम.
भारत स्वतंत्रता ३९७ दिवसानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाले परंतु भारतातील महाराष्ट्रात राज्यात काही भागात रजाकर योवणांचे शासन,गुलामीचे राज्य होते.
त्या राजवटीला हणून पडण्याच्ये मत्वपूर्न कार्य त्यावेळच्या भारतीय सरकारमध्ये असलेले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी योग्य रित्या पार पाडले.
७ सप्टेंबर च्या दिवशी भारतीय सैन्यांनी रझाकार उर्फ (कशिम रिजवी) यांच्या जुलमी हैदराबाद संस्थांनवर पोलीस बळाचा, सैन्याचा वापर करून त्यावेळेस च्या १ कोटी ३० लाख लोक संख्येला मुक्तता करून भारतातला भारताचा मराठवाडा विभाग मराठी भाषा नुसार महाराष्ट्रात जोडून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.
आर्य समाजाचे आंदोलन निजाम राजवटीला विरोधी.
हैदराबाद संस्थानातील हिंदू प्रजेवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आर्य समाजाचे १० महिने महत्वपूर्ण आंदोलन पूर्ण सफल झाले.
आर्य समाजात जात-पात,स्त्री पुरुष असा भेदभाव नसल्याने जुलमी हैदराबाद संस्थाना विरोधात हजारो आंदोलन कर्त्यानी भाग घेतला होता.
निजाम शासनाच्या अन्याय व अत्याचाराविरोधात आर्य समाजाच्या आंदोलनामुळे आर्य समाजाची मराठवाड्यात लोकप्रियता वाढत गेली.
बाबासाहेब आंबेडकर यांचे मुक्ती संग्रामासाठी मोठे बळ मिळाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हैदराबाद मुक्तिसंग्राम बाबत विचार स्पष्ट होते. हैदराबाद संस्थानातील जनतेला त्यांनी आवाहन केले होते की भारतीय संघराज्यात दाखल व्हावे व निजाम राजवट संपुष्टात आणावे ७ जून१९४७ ला त्यांनी आपल्या स्वतंत्र पत्रामध्ये हैदराबाद भारताचा एक भाग असून भौगोलिक दृष्ट्या तो वेगळा केला जाऊ शकत नाही. असे बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते.
भौगोलिक रचना.
मराठवाड्याची भौगोलिक रचना ही समथल असल्याने सुपीक व काळसर तसेच लाल गेरू मातीची जमीन आहे. या सर्व भागांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन करण्यात येत.