मराठावाडा पाणी प्रश्न.
राज्यात या वर्षी पावसाने केलेली संथ सुरुवात,येणाऱ्या भविष्यात पाणी प्रश्न सर्वांसाठी चर्चा चा विषय बनू शकतो.देशात एल निनो ने यावर्षी छाप सोडल्याने काही राज्यात पावसाने थैमान घातले तर काही ठिकाणी पूर्ण:पावसाने पाठ फिरवली आहे. महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक,मध्यप्रदेश,आंध्र प्रदेश या राज्यांना कमी पावसाचा फटका बसला आहे.
मराठवाडयात सर्वात कमी पाऊस.
मराठवाडा सर्वाधिक कमी पावसाचे ठिकाण असल्याने याचे दुष्परिणाम खरीप हंगामातील सोयाबीन,उडिद,मूग,कापसाच्या उत्पादनांवर दिसून येऊ लागला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहे.लातूर,धाराशिव संभाजीनगर,जालना,बीड, सोलापूर पावसाचा फटका बसत आहे.
जसा कावेरी विवाद होत आहे. तसाच मराठवाडा पाणी प्रश्न विवाद.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी गोदावरी असून पण सर्वात जास्त महत्त्व कावेरी नदीला दिले जाते. कारण कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात होणाऱ्या वादामुळे कावेरी नदीला अग्रगण्य महत्व प्राप्त झाले आहे. कावेरी म्हणून म्हटलं जातं कावेरी युद्ध कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यातील पाण्याच्या वाटाघाटीमुळे कावेरी नावानेच लोकांच्या मनात भावना ज्वाला सारख्या तळपत राहतात. १९७४ पासून कर्नाटक सरकार तामिळनाडू सरकार कडून परवानगी न घेता चार ते पाच नव्या जलाशयाकडे पाणी वळवण्यात प्रयत्न करत आहे.
मराठवाड्यात कावेरी सारखीच परिस्थिती उद्भवणार.
महाराष्ट्रातील खास करून मराठवाडा विदर्भ पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसा वरती शेती करावी लागत आहे.
मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी मागील दीड दशकापासून दशकापासून कृष्णा खोरे व कोयना धरणाचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी राज्यातील राजकारणी लोकांनी प्रयत्न केला आहे. पण आज पर्यंत पाणी आणण्यास यश मिळाले नाही.
जल वीवाद कायदा १९५६.
देशात जल विवाद कायदा १९५६ ला अमलात आणण्यात आला तो खालील प्रमाणे पाहूया १९५६ च्या तरतुदी नुसार संसदेत दोन नदी किंवा पाटबंधारा कायदा आणि अंतरराज्य जल विवाद कायदा १९५६ अधिनियमानुसार लागू करण्यात आला आहे.
IRWD act
अंतर-राज्य नद्या व खोऱ्यांचे नियमन आणि विकास करण्यासाठी संसदेने सार्वजनिक हितासाठी घोषित करण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत अधिकार बहाल करणे.
Climate change मुळे माराठवडा सदा दुष्काळ ग्रस्त
Climate change मुळे राज्यातील कृषी क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम दिसत आहे.मराठवाडा हा मान्सून च्या सतत लहरी पणाने दुष्काळ ग्रस्त दिसत आहे.