२०२३ हे वर्षे एल निनो मुळे जागतिक पटलावर पर्यावरणाच्या बदलामुळे गाजत आहे. ज्यामुळे देशातील बहुतांश राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास हा रखडला असल्याने राज्यातील रब्बी हंगामाची दुर्दशा दिवसेंदिवस गडद होत चालली आहे.
मराठवाडा परतीचा पाऊस
भारतीय हवामान खात्याकडून (IMD) नैऋत्य मान्सून पश्चिमी राजस्थान मधून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस विलंब होत राहिला ज्यामुळे परतीचा पाऊस राज्यात केंव्हा दाखल होईल निश्चित सांगण्यात आले नाही.
मराठवाड्यात परतीचा पाऊस पडेल की नाही याचे सपष्टीकरण (IMD) येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट करेल.
२०२२ चा परतीचा पाऊस.
मागील वर्षी याच महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग केला होता. सोयाबीन असो की खरिपातील अन्य पिकाची पूर्ती पावसाने नासाडी करून टाकली होती.
या वर्षी हाच पाऊस शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणी साठी हवा हवा सा वाटू लागला आहे.
मराठवाडा सर्वाधिक पावसाच्या प्रतीक्षेत.
ऑक्टोंबर महिन्यातील सर्वाधिक उष्ण तापमान मराठवाड्यात जाणवत आहे. मागील आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने जमिनीतील ओलावा खालावत जात असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जमिनी मध्ये ओलावा नसेल तर रब्बी हंगामातील पिकाची पेरणी लांबणीवर जाऊ शकते. किंवा पेरणी होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल.
मुंबई वाऱ्या सह पाऊस पडणार
राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने जरी साथ दिली नाही तरी येणाऱ्या ५ दिवसामध्ये महाराष्ट्र भर ढग दाटून येण्याची चिन्हं दिसत आहेत.
मुंबई च्या किनाऱ्या लगत आरबी समुद्रात कमी दाबाचा पटटा निर्माण झाल्याने वादळ वाऱ्या सह पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाडा व विदर्भात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता (IMD) व पुणे वेध शाळेने व्यक्त केला आहे.
पावसा अभावी शेतकरी निराश.
धाराशिव,संभाजीनगर,लातूर,नांदेड मद्ये मोसमी पाऊस कमी पडल्याने खरीप हंगामातील पिकाची वाढ चांगली होऊ न शकल्याने याचे परिणाम खरीप सोयाबीन,मूग,उडिद,तूर पिकांच्या उत्पादनावर दिसून येऊ लागला आहे.
खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक समस्येच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे.वाढलेले खत बियाणाचे भाव व मिळणाऱ्या कवडी मोल हमीभाव यामुळे शेतकरी आकस्मित विचारला बळी पडत आहे.