अंबोली घाट म्हटल की उंच उंच दऱ्या लाभलेला समुद्र किनारा ज्याला आपण महाराष्ट्राचा स्वर्ग असेही म्हणू शकतो हो युवकांना खिशाला मोठी झळ नबसता फिरण्याची आवड असणाऱ्यांना राज्यातील सर्वात सुंदर घाटा पैकी एक घाट असलेला आंबोली घाट भटकंतीस उत्तम पर्याय ठरू शकतो.

आंबोली बोली घाट (Amboli ghat)

पावसाळ्याला सुरूवात झाली निसर्ग जणू सजलेला दिसतो. हिरव्यागार डोंगरातून पशू पक्ष्यांचा येणार किलबिल आवाज जणू डोंगर जिवंत आहे असा होणारा भास होऊ लागतो.यातच या डोंगरातून उगम पाऊण फेसळणारे धबधबे शहरातील पर्यटकांना आकर्षित करतात.कोकणातील सर्वात सुंदर घाट म्हणून आंबोली घाटाची ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटनाची गर्दी,हिरवीगार झाडी,घनदाट जंगल, असल्याने शहरातील अनेक जण मोठ्या संख्येने घाटात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात.

सावंतवाडी ते आंबोली घाट (Savant Vadi to Amboli ghat)

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं गाव म्हणजे आंबोली, आंबोली म्हटल की डोळ्या समोर दिसत दाट धुके,फेसाळणारे धबधबे,भरपूर प्रमाणात कोसळणारा मुसळधार पाऊस आणि हिरवेगार दाट जंगल. आंबोली घाटाच्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात दर महिन्याला हजारो पर्यटक भेट देतात. याच पर्यटकांचे मुख्य आकर्षण वसुंधरेच्या कृपेने नटलेली झाडी झुडपी हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून आंबोली घाटाची ओळख.

महाराष्ट्रात निसर्गाने नटलेले भरपूर ठिकाणे आहेत. पण सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं आंबोली (Amboli) गाव हे सर्व प्रथम याच ठिकाणचं नाव घ्यावेच लागेल. सावंत वाडीपासून अवघ्या ३०किमी वर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणारा मार्ग असल्याने दोन्ही राज्यातील पर्यटकांची वर्दळ नेहमीच वाढत चालली आहे. Amboli Water fall लाभलेला मोठी गोष्टच आहे. मुंबई पासून ५३०किमी वर तर पुणे पासून ४१०कीमीच्या अंतरावर आहे.आंबोली घाट समुद्र सपाटी पासून २३००फूट उंचीवर आहे.

निसर्ग प्रेमी साठी पर्यटन स्थळ(amboli)

कोकणाला लाभलेला समुद्र किनारा पर्यटकांचं आकर्षण खेचून घेतात त्यातच अजून भर पडते सह्याद्रीच्या पर्वतरांगा मुळे निसर्ग प्रेमी साठी अरण्यात नवनवीन वास्तव्यास असणारे पशू,पक्षी, सस्तन प्राणी, विविध प्रकारचे बुरशी, सरपटणारे प्राणी,फुलपाखरे येथील मुख्य पर्यटन स्थळ महादेव गड,नारायण गड,कावळेसाड,नांगरतास धबधबा,हिरण्यकेशी धबधबा याच धबधब्या समोर गुहेच्या तोंडाजवळ भगवान शंकराचे मंदिर आहे. कोकणातील निसर्ग हा स्विझर्लंड पेक्षा कमी नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *