महानंदा
MSRDMM म्हणजे (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित) महानंदा डेअरी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन वाढवणे राज्यातील तालुका व जिल्हा स्तरीय दूध संघाची स्थापना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणणे शहरी वसाहती अपुऱ्या दुधाच्या गरजा पूर्ण करणे हे मुख्य धोरण राबविले होते.
दूध संघा कडून माफक दरात खरेदी करणे आणि ग्राहकांना स्वस्त दरामध्ये दूध उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश या संघाचा होता एकेकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध दूध सहकारी संस्था म्हणून ख्याती प्राप्त झाली होती. त्यावेळी महनंदाचे नाव देशभर पसरले असूनही म्हणावे तेवढे यश प्राप्त करता आले नाही.
मागील दशकापासून परराज्यातील मोठ मोठ्याला कंपन्यांनी राज्यातील दुधाची बाजारपेठ ओळखून स्थानिक व्यवसायास प्रोत्साहन देत दुग्ध व्यवसाय हळ हळू काबीज करून घेतले.
आपण एकीकडे जय महाराष्ट्र नावाची गर्जना सर्वांच्या समोर देत राहतो पण महाराष्ट्रातील व्यवसायिकांनी तयार करून ठेवलेल्या मालास साफ नाकारून बाहेरील राज्यातील कंपन्यांनी उत्पादन केलेल्या मालास पसंती देत राहिलो. याच ज्वलंत उदाहरण म्हणजे महानंदा डेअरी आहे.
महानंदा दूध घाटा (mahananda milk crisis)
आधुनिक विपणन तंत्रज्ञानामुळे देशातील तसेच राज्यातील खासगी क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा परिणाम सहकार क्षेत्रावर व दूध विक्रीत झाला आहे. या आर्थिक घटकाचा तोटा सर्वाधिक महानंदा दूध डेअरीस झाला आहे. सरकारी अहवालानुसार २०२० ते २०२२ या वर्षी प्रति दिवस ०.५० लाख लिटर खपत दररोज होत होती तर याच वर्षात महाराष्ट्रात खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या डेअरी ची खपत १२३ ते १२७ किलो दररोज होत होती.
महानंदा डेअरी उत्पादने (Mahananda Dairy Products)
महानंदा डेअरीचे राज्यात प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरावर व्यवसायिक डेअरी असल्याने दुधाचा ओघ कायमच गजबजलेला दिसतो. अगदी लातूर, धाराशिव,बीड यासारख्या दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यामध्ये ही महानंदा डेअरी मोठ्या नफ्याने व्यापार करत आहे. दूध विक्री पासून ते थंड आइस्क्रीम, पनीर, दही, ताक,तूप,असे अनेक उत्पादन ही कंपनी बनवते.
गुजरात स्थलांतर (Gujarat migration)
देशाचे पंतप्रधान म्हणून ऐका गुजराती माणसाची निवड झाली आहे तेंव्हा पासून अनेक व्यवसायिक कंपन्या भांडवलाच्या जोरावर गुजरातला स्थलांतर या गुजराती व्यवसायकांच्या ताब्यात जाताना दिसत आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील बरेच व्यवसाय गुजरात जाण्याने नागरिकांमध्ये हिन भावना निर्माण झाली आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी डेअरी असलेली महानंदाचे व्यवस्थापन ही गुजरात मधील कंपनी कडे देऊ केल्याने गुजरात नाव महाराष्ट्राला पोखरणार वाटू लागले आहे.
दुग्ध व्यवसाय (dairy business)
दुध व्यवसायासाठी मागील सरकारने केलेलं कार्य शेतकऱ्यांचे हित ठरवणारे दिसते. ज्यात ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय असो की पशू पालन, शेतकऱ्यांना राज्य सरकार मार्फत दूध व्यवसायास दिल्या जाणाऱ्या सवलती ज्यात म्हशीचा गोठा, चारा, पशू विकत घेण्यास अनुदान याचे सकारात्मक प्रभाव दूध वाढीस दिसतो आहे.
ज्या पद्धतीने मागील तीन वर्षापासून दुधाचे भाव स्थिर राहिले याचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. पशूंना लागणारा चारा, पेंड, औषेधे यांची होणारी वाढ दूध व्यवसायास नुकसान दायक ठरत आहे
महानंदा डेअरी स्थापना. (Mahananda Dairy Establishment)
महाराष्ट्रात दूध व्यवसायास चालना देणे व शेतकऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे महाराष्ट्रातील दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची शिखर संस्था म्हणून १९६७ साली महाराष्ट्र राज्य दूध संघाची स्थापना करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने १९८३ साली मुंबई आणि उपनगरीय शहरात महानंदा दूध डेअरी या नावाने स्थापना करण्यात आली.
व्यवसायिक अतिक्रमण.(Commercial encroachment)
देशात ज्या पद्धतीने भांडवल शाहीचे वर्चस्व वाढले आहे. हे लघु उद्योगाला होणारे नुकसान परवडणारे नाही. असे व्यवसायिक अतिक्रमण होत राहिले तर राज्य निर्मित व्यवसायिकांचा तोटा वाढू शकतो.
मागील काही महिन्यापूर्वी तामिळनाडू , कर्नाटक , आंध्र प्रदेश, तेलंगणा,केरळ या सरकारने अमुल दूध विकण्यास मनाई केली होती. कर्नाटक सरकारने नंदिनी तामिळनाडू अविन, तर केरळ सरकारने मिल्मा हे स्थानिक पातळीवर दूध ब्रँड विकसित केले असल्यामुळे या राज्यात अमुल दूध विकण्यास मनाई केली जाते.
त्याच पद्धतीने महाराष्ट्रात उपयोग केला असता महानंदा, चितळे असे अनेक दूध उत्पादक संस्थांना मोठे बळ मिळून आर्थिक घट्यातून बाहेर येतील