linseed जवस
जवस महाराष्ट्रात रब्बी हंगामातील मुख्य पिका पैका ऐक पीक आहे. याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस विदर्भ व मराठवाड्यात पेरणी करण्यात येते. जवसाचा उपयोग तेल गाळप व धागा बनविण्यासाठी वापर केला जातो.
जवस हे मानवी शरीरासाठी अतिशय पौष्टिक व अती उपयोगाचे असल्याने त्यामधून शरीरासाठी ७ ते ८ प्रकारचे लाभदायक प्रथिने, जीवनसत्व मिळत असल्याने याचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये केला जातो.
उत्पादन करणारे प्रमुख देश.
रशिया, कझाकस्तान, अमेरिका, मेक्सिको, ब्राझील ऑस्ट्रेलिया, भारत
जमीन मशागत
जवस पेरणीसाठी उत्पादनाचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी जमिनीची प्रत योग्य पाण्याचा निचरा होणारी असायला पाहिजे.
खरिपातील पिकाची काढणी झाली असता जमीन कोळपणी करून घ्यावी जेणे करून रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी काडी कचरा, पिकाची खोडके वेचून घ्यावी ज्यामुळे पिकाला हानी पोचणार नाही.
सुधारित जात.
वानाचे नाव कालावधी. हे. उत्पादन
१) एन. एल. ९७ ११५ ते १२०. ४ ते ५ क्विंटल
२) एन. एल. १४२ ११६ ते १२१ ४.५ ते ५क्विंटल
३) एन. एल. १६५. ११६ ते १२२ ३ ते ४ क्विंटल
४) एन. एल. २६०. ११० ते ११८. ४ ते ४.५ क्विंटल
५) लातूर – ९३ ९५ ते १०५ ५ ते ६ क्विंटल
जवस पेरणी.
जवस या बियाणांची पेरणी रब्बी हंगामात ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.
मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी अंतर पीक म्हणून सुद्धा जवसाची लागवड सुरुवात केली आहे.
लातूर ९३ या वाणाची जशी निर्मिती करण्यात आली आहे तेंव्हा पासून कोरडवाहू क्षेत्रात जवसाची उत्पादन क्षमता ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे.
पर्यावरणाच्या बदलामुळे गळीत तेल बिया वरती मोठा प्रभाव झाला असून ज्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
लातूर ९३ हे २०१७ सली विकसित केले आहे.या वाणामुळे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना जवसाची लागवड वरदान ठरतं आहे.
जवस खाण्याचे फायदे.
जवसाच्या नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण, ट्रायग्लिसराइड्स, कॉलेस्ट्रॉल व हिमोग्लोबिन आटोक्यात ठेवण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे.
जवसाचे नियमित स्त्रियांनी सेवन केले असता शरीरात हार्मोन्सची पातळी व्यवस्थीत राहून त्वचा चमकदार व मुर्माची समस्या दूर होते.
जवस तेलाचे फायदे.
फ्लेक्स सीड ऑईल मुळे शरीरात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे.
ओमेगा -३ फॅटी ऍसिड फ्लेक्स सीड ऑईल मुळे मेंदूचे विकार कमी होऊन मेंदूस संरक्षण मिळते. यासोबतच ब्लड प्रेशर चे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी – असल्याने केसांच्या मुळांना मजबूत बनवते व व्हिटॅमिन इ केस गळतीवर लाभदायक उपचार करून गळणाऱ्या केसास उगविण्याची क्षमतेत वाढ करते.
जवसातील जीवन सत्वाचे प्रमाण.
जवस भारतातील थंड हवामानात म्हणजे रब्बी हंगामात येणारे पीक आहे. यात जीवन सत्वाचे प्रमाण अधिक असल्याने प्रमाण पाहणार आहोत
- १०० ग्रॅम जवसात २० ग्रॅम प्रोटीन २८ टक्के कार्बोहाइड्रेट १७ टक्के फायबर चे प्रमाण मिळते
- व्हिटॅमिन बी -५
- फोलेट, नायसिन
- पोटेशियम, रोलेनियम,
- रयबोक्लोवीन, मॅग्नेशियम, मॅग्नीज, फॉस्फरस
या सर्वांचे प्रमाण वनस्पती मध्ये मिळते.