Lentil मसूर
भारतीय कडधान्य मसूर डाळ मोठ्या प्रमाणात दररोजच्या आहारात वापरात येत असल्यामुळे मसूर डाळीला अती महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
स्वयंपाक घरात महिलांच्या सर्वात जास्त आवडीची डाळ म्हणजे मसूर डाळ म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कारण मराठवाड्यात याच डाळी पासून प्रत्येक घरोघरी (वरन) ही भाजी बनवल्याशिवाय राहत नाही.
राज्यात कडधान्य पिकामध्ये रब्बी हंगामातील मसूर पिकाला दिवसेंदिवस मागणीत वाढ होत असल्याने येणाऱ्या भविष्यात पिकाचे उत्पादनात कश्या प्रकारे वाढवता येईल हे आज आपण पाहणार आहोत .
मसूर लागवड
रब्बी हंगामातील डाळीच्या पिका मधील मसूर या पीकास अती महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र हे १०,५०० हेक्टर पर्यंत पेरणी करन्यात येईल असे शासकीय आकडेवारीत सांगण्यात आले आहे.
जमीन
हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. या पिकास काळी व मध्यम आकाराची व योग्य पाण्याचा निचरा जसे चिकणी जमीन असायला पाहिजे.
हवामान
पिकाची पेरणी रब्बी हंगामात प्रामुख्याने केली जाते. या पिकास तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान लाभदायक मानले जाते.
पेरणी
या वाणाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हेक्टरी २० ते २५ किलो बियाणाची पेरणी करावी.
खत व्यवसथापन
खत व्यवस्थापण करते वेळी नैसर्गिक अवस्थेत कुजलेला खतांची पोषक मात्रा द्यावी जसे की शेणखत प्रति हेक्टरी १० टन द्यावे. ज्यामुळे जमीनीचा पोत (PH) सुधारते व कंपोष्ट खत झाडाच्या बुंध्याला देण्यात यावे.
मसूर सुधारित जाती
भारतीय मसूर उत्पादनात खालील मसूर बियांनाची सर्वाधिक लागवड केली जाते
- पुसा १ व पुसा ५ -( कालावधी १२२ ते १३० दिवस)
- डब्ल्यू बी ९४ -(कालावधी १२२ ते १३० दिवस)
- पंत एल २३४ -(कालावधी १२६ ते १३० दिवस)
- शेरी – (डी.पी.एल ६२)कालावधी १२७ ते १३० दिवस)
- अरुण – (पी एल ७७७-१२)
- पंत मसूर – (कालावधी १३८ ते १४२ दिवस)
- वी एल मसूर
- बी आर २५ – (कालावधी १२६ ते १३० दिवस)
- नुरी (आई. पी. एल .८१)
- नरेंद्र मसूर. – परिपक्व कालावधी १३५ ते १४० दिवस
हेक्टरी उत्पादन
वरील वाणाची निवड करून पेरणी केली असता सरासरी प्रति हेक्टरी उत्पादन १० ते १२ क्विंटल पर्यंत मिळते.
तन नियंत्रण.
नोव्हेंबर महिन्यात पेरणी झाल्याने दव मोठ्या प्रमाणात पडते त्यामुळे गवताची वाढ होऊ नये म्हणून पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी पहिली तर ४९ ते ४२ दिवसांनी दुसरी खुरपणी करून घ्यावी.
कीड नियंत्रण.
तन संपूर्ण नायनाट करण्यासाठी रासायनिक औषधे वापरली जात आहेत. त्यात फ्लुक्लोरीन किंवा पेंडीमेथीलिन ७५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मसूर डाळीचे फायदे
- मसूर डाळीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते.
- म्हातारपण चेहेऱ्यावर लवकर दिसणार नाही.
- त्वचा चमकदार राहते.
- हाडे व दात स्वच्छ व चमकदार दिसू लागतात.
- पोटातील गॅस व ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.
- मसूर डाळ नियमित सेवनाने हृदय निरोगी राहते कॅलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर समस्या दूर होते.
मसूर डाळीपासून मिळणारे जीवनसत्व
मानवी शरीराला मिळणारे पौष्टीक जीवनसत्व
- ‘बी’ जीवनसत्व
- ‘सी’ जीवनसत्त्व
- फॉलीक एसिड
- व्हिटॅमिन बी
- फायबर
- पोटॅशियम
- लोह
या डाळ मधील तंतू मय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी वरदान ठरतं आहे.