लिंबू हा भारतीय आहारातील अन्न पचन करण्यासाठी वापरत येणार मुख्य घटक आहे. जेवणाची चव वाढवण्यापासून ते सरबत बनवण्या रोजच्या वापरात येणारा असल्याने याची मागणी दर दिवसाणी वाढ होत चालली आहे.

लिंबू लागवड फायदा 

शेती फायद्यामध्ये आणायची असेल तर शेती लागवडी मध्ये बदल करणे गरजेच आहे. पारंपरिक पीक पद्धतीला बगल देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साठी नवीन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. सध्या मार्केट मधील बाजार भावात होणारे बदल लक्षात घेता खरीप असो की रब्बी हंगाम या दोन्ही  हंगामातील पिकाला मिळणारा हमीभाव हा शेतकऱ्यांना परवडणारा नसून कारण खत बी बियाणे पावसाचा अनियमित पणा शेतीस असणाऱ्या आपुऱ्या सुख सुविधा या सर्वांचा ताळमेळ बिघडत असल्याने शेतकरी बळिराजा आर्थिक संकटात सापडत चालला आहे.

लिंबू लागवड शेतकऱ्यांना आर्थिक लाभ   

अनेक शेतकरी हे पारंपरिक शेती सोडून फळबाग लागवडीकडे वळले आहेत परंतु यातील काही फळबाग शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत कारण फळबागेसाठी लागणारा रासायनिक खत,विविध प्रकारचे फवारणी औषधे फळाला न मिळालेला दर कारणीभूत आहे. फळबाग म्हटल की आंबा,मोसंबी,काजू,द्राक्षे,केळी,डाळिंब,सीताफळ या पिकाची माहिती लक्षात येते. पण आपण दर रोजच्या वापरत येणाऱ्या लिंबू बाग हे आपणाला माहीत नसते. लिंबू हे पीक लागवडी पासून ते तोडणी पर्यन्त याला कोणत्याही प्रकारची फवारणी किंवा रासायनिक खताची आवश्यकता नसते १२ महा याचे उत्पादन चालू असल्याने हे एक पैष्याच झाड लावल्यासारखे आहे.

 लिंबू दर ३५०० पासून १३००० प्रती क्विंटल

मागील काही वर्षा पासून लिंबूचा दर सर्वसाधारण राहत असल्याने शेतकरी ही चिंतेत होते पण लिंबूची मागणी वाढल्याने हेच दर मागील वर्षी ३ हजार रुपया पासून १३ हजार पर्यन्त दर मिळत आहे.पारंपरिक फळबाग पिका उत्पादनातून जास्त नफा मिळत असल्याने शेतकरी लिंबू लागवड करत आहेत. शिवाय तुम्ही लिंबू लागवड करून स्वत:मार्केट मध्ये लिंबू विकत असाल तर तुम्हाला अजून नफा मिळणार आहे.

लिंबू लागवडीसाठी योग्य हंगाम 

लिंबू लागवड जून महिन्यात केली पाहिजे जेणे करून कोणत्याही फळ झाडांसाठी उपयुक्त काळ मानला जातो कारण वर्षा ऋतु मध्ये उन्ह व कमी असल्याने व हवेत अद्रतेच प्रमाण जास्त असल्याने रोपे जमिनीत लवकर रुजले जातात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *