महाळूंग-गळ लिंबूचे चे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहे का

पोटाचे आजार किंवा पोट दुखी व शरीरात होणारे अम्लपीत्ता साठी आपण महागड्या गोळ्या घेत राहतो पण घरगुती वापरात असणारे महाळूंग-गळ लिंबूचे रस पिल्याने हे आजार नाहीसे होतात ते आपन या लेखात पाहणार आहोत.

लिंबू,संत्री,मोसंबी,या वर्गात महाळूंग-गळ लिंबू अत्यंत शरीरासाठी लाभदायक रुचकर फळ आहे. ज्याचा वापर नित्य नियमाने केलात तर तुम्हाला कोणताही शारीरिक विकार तसेच पोटात अन्न पचन व गॅस तयार होऊ शकणार नाही. हे फळ साधारण पेरूच्या आकाराचे व लिंबुच्या ५ पट मोठे असते मोठे असते व या महाळूंग-गळ लिंबू साल संत्रा साल एवढी जाड असू शकते. हे फळ झाडावर पिकले असतां फळाचा कलर हा एकदम पिवळसर पडतो व खाण्यासाठी अंबूस कमी गोड चवदार लागतो

महाळूंग-गळलिंबुचे औषधी फायदे. 

गळ लिंबूचे औषधी गुणधर्म

आयुर्वेदात गळलिंबूचे सेवन करणे शरीरासाठी हितकारक मानले गेले आहे. पचनसंस्थेचे विकार, कॉलेस्ट्रॉल व रक्त शुद्धीकरण तसेच ह्रदय वीकारापासून काही  पोटातील विकार कमी करण्यासाठी गळलिंबुचा वापर केल्यास निश्चितच  फायदा होऊ शकतो.

१)आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर गळलिंबूचे सेवन करणे हितकारक ठरू शकते.

२)उलटी होणे मळमळ होणे तोंडाला चव नसणे या सर्वांचा उपाय.

३)गळ लिंबू चे नयमित सेवन केल्याने किडनीस्टोन मुळे होणाऱ्या वेदना कमी होऊन किडनी स्टोन मूत्र विसर्जनातून निघून जातो.

४)गळ लिंबूचे खावटे डोक्यावर चोळल्याने केस गळती कमी होऊन केस सुंदर दिसू लागतात

५)दूध देणाऱ्या पशू चे पोट फुगले किंवा वैरण अपचन झाली तर पशूला ही गळ लिंबू दिला जातो

 मानवी जीवनास होणारे गळलिंबू चे फायदे.

  • महिलांसाठी गळ लिंबू फार महत्वाचा आहे.ज्या मासिक स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही व पाळी वेळी फार त्रास होतात त्या स्त्रियांसाठी गळ लिंबूच्या बिया डॉक्टर च्या सल्ल्या नुसार वापरत आणावे.
  • गळलिंबू हृदयाला आराम व हृदयविकार पासून बळ देणारे आहे. गंभीर आजाराने हृदय हे कमकुवत होते या फळांचा वापर केल्याने आजार नंतर शरीर सदरुड राहते.
  •  क्षारांपासून बनलेल्या लहान खडे  मूत्र नळीत साठले जातात या अनधिकृत क्षारांपासून गळलिंबू चे सेवन केल्याने मुक्तता मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *